Google Ad
Editor Choice Pune District

Dehuroad : देहुरोड छावणी परीषेधमधील सफाई कर्मचारी यांचा कोरोनाने मृत्यु … त्याच्या कुटुंबाला ५० लाखाच्या विमा संरक्षणाची रक्कम द्या!

महाराष्ट्र 14 न्यूज : देहुरोड छावणी परिषदेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कर्तव्यावर असलेले रंधीर किसनलाल बांधल यांना कोरोनाचा संसर्ग झाला, त्यात त्यांचा मृत्यु झाला. यांच्यावरच कुंटुबाची उपजिवीका अवलंबून असल्याने कुंटूबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. मा. पंतप्रधान यांनी या कोरोना काळात कर्तव्यावर असणारे वैदकीय तज्ञ, पॕरामेडीकल स्टाप, व सफाई कर्मचारी हे खरे कोरोना योध्दा आहेत. त्यांच्या सन्मानार्थ टाळ्या ,थाळ्या ,वाजवून सन्मान करण्याबरोबरच अशा करोना योध्दा यांना करोना काळात कर्तव्यावर असताना ५० लाखाचे विमा संरक्षण देण्याचे जाहीर केले होते.

त्या प्रमाणे देहुरोड छावणी परीषेध मध्ये कर्तव्यावर असणारे सफाई कर्मचारी यांचा कोरोनाने मृत्यु झाल्याने त्यांच्या कुटूंबाला ५० लाखाची विमा संरक्षण रक्कमेबरोबरच देहुरोड छावणी परीषेधेने आर्थिक मदत करावी अशी मागणी मानवी हक्क संरक्षण जागृतीचे अध्यक्ष विकास कुचेकर, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी देहुरोड छावणी परिषदेचे रामस्वरुप हरीतवाल यांना निवेदनाव्दारे केली आहे.

Google Ad

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!