Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

दिलासादायक : पिंपरी चिंचवड शहराततील ३३.९% नागरिकांमध्ये कोरोनाला हरवण्याची प्रतिकारशक्ती … सिरो सर्व्हेक्षण मध्ये मिळाली माहिती!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका व डॉ.डि.वाय.पाटील मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटर यांचे संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड शहर SARS – CO 2IgG antibodies सर्वेक्षण बाबत पत्रकार परिषद दि .२ नोव्हेंबर २०२० रोजी आयुक्त याच्या दालनात आयोजित करण्यात आली होती, यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे , आयुक्त श्रावण हर्डीकर

स्थायी समिती सभापती संतोष लोंढे , सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके , विरोधी पक्षनेता राजू मिसाळ , नगरसेवक मोरेश्वर भोंडवे , अतिरिक्त आयुक्त अजित पवार , अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ . पवन साळवे , सहाय्यक आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ . लक्ष्मण गोफणे , महिला वैद्यकिय अधिकारी डॉ . वर्षा डांगे , कोविड तांत्रिक समिती सल्लागार डॉ.सुभाष साळुखे , डॉ.डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेजचे डॉ.अमितव बॅनर्जी डॉ.भार्गव गायकवाड , डॉ.अतुल देसले उपस्थित होते.

Google Ad

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोविड -१९ रोगाचा प्रार्दुभाव किती झाला आहे . हे पाहण्याकरिता तसेच किती लोकांमध्ये याबाबत रोग प्रतिकार शक्ती निर्माण झाली यासाठी नागरिकांची सार्स – कोविड -२ आय.जी.जी. ऍन्टीबॉडीज तपासणी ( सिरो सर्व्हे ) मोहिम दि .७ ऑक्टोबर २०२० ते १७ ऑक्टोबर २०२० दरम्यान राबविण्यात आली होती . या मोहिमेच्या सर्वेक्षणासाठी १० पथके तयार करण्यात आलेली होती या पथकांकडून वेगवेगळ्या तीन क्लस्टर झोन मधून सदरचे सर्वेक्षण १० दिवस करण्यात आले असून ५००० नागरिकांचे रक्त नमुने घेण्यात आले होते .

मोहिमेच्या सर्वेक्षणासाठी घेतलेल्या नमुन्यांची आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज तपासणीसाठी आय.सी.एम.आर व्दारे प्रमाणित अबॉट सीएमआयए टेस्ट व्दारा करण्यात आली आहे . सदर सर्वेक्षणामध्ये पॉझिटिव्ह आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज आढळून आलेल्या आहेत . यामध्ये शहरातील ३३.९% नागरिकांमध्ये सर्वसाधारण अँटिबॉडीज आढळून आल्या यात झोपडपट्टी भागातील नागरिकांमध्ये ३७.८ % झोपडपट्टी सदृश भागातील नागरिकांमध्ये ३८.३ % गृहनिर्माण सोसायटी भागातील नागरिकांमध्ये २७.७ % पॉझिटिव्ह अँटिबॉडीज आढळून आल्या यात पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख गावठाण विनायक नगर मधील सर्वसाधारण भागातील याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ७४ % होते.

आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज महिलामध्ये दर ३३.८ % पॉझिटिव्ह आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज पुरुषांमध्ये दर २८.९ % महिलांमधील पॉझिटिव्ह आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज चा दर पुरुषांपेक्षा जास्त आहे . पॉझिटिव्ह आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज वयानुसार ५१ ते ६५ वर्षाच्या नागरिकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून आले असून त्याचा दर ३५.५ % इतका आहे . किशोरवयीन १२ ते १८ वर्षाच्या मुला मुलींमध्ये ३४.९ % इतका आहे . १ ९ ते ३० वयोगटामध्ये २ ९ .७ % , ३१ ते ५० वयोगटामध्ये ३१.२ % व ६६ वर्षांवरील नागरिकांमध्ये २८.२ % इतका आहे . कोविड -१९ मुळे असणारा सर्वसामान्य मृत्यु दर ०.१८ % इतका आहे .

सदरील सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले आहे की , पिंपरी चिंचवड शहरातील ब – याच मोठया प्रमाणातील लोकसंख्येमध्ये पॉझिटिव्ह आय.जी.जी. ऍन्टीबॉडीज दिसून आलेल्या आहेत . परंतु भविष्यात दिवाळी सण व हिवाळा असल्याकारणामुळे कोरोना विषाणूंचे संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरणे , सुरक्षित अंतरभान ठेवणे आणि हात वारंवार धुणे आदी कोरोना विषयक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी यावेळी सर्व नागरिकांना केले आहे.

तसेच नेहरू नगर येथील जम्बो कोविड सेंटर ( अण्णासाहेब मगर स्टेडियम ) आणि ऑटो क्लस्टर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी उपचार घ्यावेत असे आवाहन आयुक्तांनी केले. महापौर माई ढोरे यांनी कोविड करीता राखीव असलेले महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय नॉन कोविड करून पूर्वी प्रमाणे सर्व नागरिकांना सर्व उपचारासाठी खुले करण्यात आले असल्याचे यावेळी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!