Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

सांगवी गावातील नागरिक वाढत्या डासांच्या त्रासाने हैराण … ‘अतुल शितोळे’ यांनी मच्छरदाणी घेऊन काढला अनोखा निषेध मोर्चा!

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि.२१ मार्च) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सांगवी गावातुन मुळा व पवना या दोन नद्या वाहतात. या नद्यांच्या प्रभाव क्षेत्रामध्ये बेसुमार जलपर्णी वाढली आहे आणि त्यामुळे पाण्याचा प्रवाह पूर्णपणे थांबला आहे. या जलपर्णीमुळे या परिसरात डासांचा (मच्छर) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मच्छर यांचे प्रमाण संध्याकाळनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर असतो की घरात व घराबाहेर नागरिक दोन मिनिटे देखील एका जागेवर थांबू शकत नाहीत, यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून काहीएक उपायोजना होत असताना दिसत नाहीत व यामुळे सांगवीतील नागरिकांना या डासांचा महाभयानक त्रास सहन करावा लागत आहे.

पाऊस पडून नदीतील पाण्याचा प्रवाह वाढून पावसाळ्यापर्यंत हा त्रास सहन करावा लागणार आहे. तोपर्यंत या जलपर्णी काढण्याचे टेंडर न काढता व पाऊस पडल्यावर नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यावर महानगरपालिका या कामाचा ठेका ठेकेदारास देऊन महानगरपालिकेच्या या कामात मलई लाटण्याचे काम करतील असेच म्हणावे लागेल.

Google Ad

आज सांगवीतील सर्व स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन माजी नगरसेवक अतुल शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचा निषेध करण्यासाठी मूक मोर्चा काढला. हा मोर्चा निषेधात्मक प्रकारचा होता. यावेळी मच्छरदाणी हातात घेऊन सांगवी गावातुन हातात डास मारण्याची बॅट घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला बॅट व मच्छरदाणी यासाठीच की विणा मच्छरदानी व बॅट ( मच्छर मारण्याची ) आपण गावात कुठेही फिरू शकत नाही.

या मोर्चामध्ये माजी नगरसेवक अतुल शितोळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप सुनील ढोरे, कुमार ढोरे, सिकंदर पोगंडे ज्येष्ठ शिवसेना नेते तसेच ओमकार महेश भागवत व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन करून मोर्चात सहभाग घेतल्याचे यावेळी दिसून आले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!