Google Ad
Editor Choice Maharashtra

Chandrapur : आईसोबत फिरायला गेलेल्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला … CISF जवानाच्या ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. संध्याकाळी फिरायला निघालेल्या निघालेल्या आई-मुलीवर बिबट्याने अचानक हल्ला केला. यात बिबट्याने मुलीवर झडप घालून उचलून नेले. त्यानंतर शोधाशोध केली असता ही चिमुरडी एका झुडपात आढळली. रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मुलीचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. बिबट्याच्या या हल्ल्याने परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे.

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या गजबजलेल्या पर्यावरण चौकात बिबट्याच्या हल्ल्याची ही घटना घडली. संध्याकाळी फिरायला निघालेल्या निघालेल्या आई-मुलीवर बिबट्याने अचानक हल्ला केला. यावेळी आईच्या डोळ्यासमोर बिबट्याने ५ वर्षाच्या चिमुरडीला उचलून आजूबाजूच्या जंगलातील झुडपांमध्ये धूम ठोकली. आरडाओरडा करुन गर्दी एकत्र झाल्यावर झुडपी जंगलात मुलीचा शोध घेण्यात आला. या दरम्यान नागरिकांना जखमी अवस्थेतील अर्धमेली चिमुकली आढळली.

Google Ad

मुलीला तातडीने सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिला रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरानी जखमी चिमुरडीला मृत घोषित केले. भर दिवसा बिबट्याच्या हल्ल्यात सीआयएसएफ (CISF) जवानाच्या मुलीच्या मृत्यूने प्रशासन हादरलं आहे. लावण्या उमाशंकर दांडेकर असं चिमुरडीचं नाव आहे. आपल्या डोळ्यासमोर खेळणारी आपली मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात गमावल्याने सीआयएसएफ जवानाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या हल्ल्यानंतर चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची सुरक्षा करणाऱ्या जवानांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

100 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!