Google Ad
Editor Choice Maharashtra

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले : राज्यात कडक निर्बंध लादणार … कडक लॉक डाऊनचा इशारा देतोय, अन्यथा … आणखी काय-काय म्हणाले

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ एप्रिल) : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल (गुरुवारी) तब्बल 43 हजार कोरोना बाधितांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात तर कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट झाला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

🔴मुख्यमंत्र्यांचे बोलण्यातील महत्वाचे मुद्दे :

Google Ad

🟢घाबरवण्यासाठी आलेलो नाही, मार्ग काढण्यासाठी आलो आहे, घाबरू नका : मुख्यमंत्री

🟡राज्यातील परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी मी संवाद साधत आहे. कोरोनाचा शिरकाव होऊन आता वर्ष पूर्ण झालं आहे. मधल्या काळात या विषाणूला रोखण्यास आपण यशस्वी झालो होतो.

▶️कोरणाणामुळे जगाची आर्थिक परिस्थिती दोलायमान झाली आहे.

▶️लोकडाऊन करण्याची शक्यता पूर्णपणे टळलेली नाही.

▶️लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाल्यानं कोरोना वाढला.

🔴 नवी सांगवी फेमस चौक येथे 1 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे. संपर्क : – 8999284895

▶️अडीच लाख चाचण्या राज्यात रोज करणार, केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार चाचण्या होणार. 70 टक्के आर्टीपीसीआर चाचण्या करणार.

▶️लॉकडाऊन होणार का? याचं उत्तर मी आता देत नाही.

▶️पाचशे चाचण्यांची सेंटर उभारली आहेत, 50 हजार चाचण्या दर दिवसाला करत आहे.

▶️महाराष्ट्रात 75 हजार चाचण्या करण्याची क्षमता 1 लाख 82 हजार एवढी झाली आहे. पण त्याहीपेक्षा अडीच लाख क्षमता करायची आहे.

▶️काहीही आपण लपवत नाही आणि लपवणार नाही, सत्य काय आहे ते जनतेसमोर ठेवत आहे.

▶️मला माझा महाराष्ट्र प्यारा आहे मला विलन जरी ठरवलं तरी मला चालेल. गेल्या वर्षी परिस्थिती गंभीर होती बेड्स अब्युलन्स मिळत नव्हती.

😷लस घेतल्यावरही काहीजण कोरोनाबधित होत आहेत. लस घेतल्यावरही काळजी घेणं गरजेचं आहे. मास्क वापरणे आवश्यक आहे. लस घेतल्यावरही कोरोना होणार मात्र त्याची तीव्रता कमी असेल.

▶️रुग्ण वाढ झपाट्यानं होतं आहे. एकट्या मुंबईत 8 हजारांहून अधिक रुग्ण वाढत आहे.

▶️आज 46 हजारपर्यंत संख्या वाढत चाललेली आहे. सुविधा आपण आवश्यकतेनुसार वाढवत चाललो आहे. बेड्स व्हेटिंलेटर, ऑक्सिजन जरी वाढले तरी डॉक्टर कसे वाढणार? आरोग्य सेवकांना कोरोनानं ग्रासले आहेत.

▶️अनेक साईड इफेक्ट दिसून येतात. आरोग्य सेवक निगेटिव्ह आल्यानंतर लगेच ते आपल्या सेवेत येत आहेत.

🔴 नवी सांगवी फेमस चौक येथे 1 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे. संपर्क : – 8999284895

🔬टेस्टींग वाढवत आहेत, बोलणारे बोलतात लसीकरण वाढवले पाहिजे असं केलं पाहिजे. लसीकरणात एका दिवसात 3 लाख नागरिकांना लस दिलेली आहे.

👩‍👩‍👧65 लाख नागरिकांना आपण लस दिली आहे.

😷केद्रानं आणखी लस पुरवली पाहिजे, मी टीका करत नाही लस घेतल्यानंतर मास्क लावले पाहिजे.

▶️लोकडाऊन करायचं का? यात राजकारण आणू नका. अमेरिका, ब्राझील, रशिया, फ्रान्समध्ये परिस्थिती गंभीर आहे.

▶️वर्क फ्रॉम होम बंधनकारक, आवश्यक गोष्टींनाच परवानगी त्या ठिकाणी दिलीय.

🔴राज्यात लॉकडाऊन की मिनी लॉकडाऊन

राज्यात लॉकडाऊन करण्यावरून मतभेद पहायला मिळत असून अनेकांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे.

लॉकडाऊन करणे हे राज्याच्या हिताचे नसून, राज्यात लॉकडाऊनला पर्याय म्हणून कडक निर्बंधांसह ‘मिनी लॉकडाऊन’ चा विचार सध्या सुरू आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

26 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!