Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे कोविडचा संसर्ग-मृत्यू दर कमी होईल … ‘उध्दव ठाकरे’

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि.२३) : ‘माझे कुटुंब , माझी जबाबदारी’ सारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून त्याचा परिणाम येणाऱ्या काळात मृत्यू दर आणि कोविड पॉझिटिव्हिटी दर  कमी झालेला आपल्याला दिसेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. राज्यात सर्वत्र टेलिआयसीयू व्यवस्था उभारून ग्रामीण भागातील रुग्णांना वेळीच उपचार कसे मिळतील हे आम्ही पाहणार आहोत असेही ते म्हणाले.

कोविडनंतरदेखील रुग्णांमध्ये वैद्यकीय उपचारांची गरज असून उपचार केंद्रे सुरु  करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला ,त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब , तामिळनाडू या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीदेखील यावेळी बैठकीत सहभाग घेतला.

Google Ad

महाराष्ट्र के लोग बहादूर- पंतप्रधान

यावेळी पंतप्रधानांनीदेखील महाराष्ट्र के लोग बहादुरीसे  सामना करते है असे सांगून कोविडचा संसर्ग जास्त असलेल्या महाराष्ट्रातल्या २० जिल्ह्यात विशेष समर्पित पथके नियुक्त करून संसर्ग कमी केल्यास देशाच्या कोरोना आकडेवारीवर परिणाम होईल अशी सूचना केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, पंतप्रधानांनी आपल्या स्तरावरून परत एकदा देशातील नागरिकांना संबोधन करून कोरोनाचा लढा आपल्याला पुढील काळात कसा लढायचा आहे याविषयी मार्गदर्शन करावे. येणाऱ्या काळात सणवार, उत्सव येत असून कोरोना वाढू नये म्हणून आपल्यासमोर आव्हान आहे.

दररोज दीड लाखापर्यंत चाचण्या वाढविणार मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्य सरकार करीत असलेल्या काही महत्त्वाच्या उपाययोजनांची माहिती दिली. राज्यात लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांच्या घशातून दोन द्राव घेतले जातात.रॅपिड एन्टीजेन चाचणी  निगेटिव्ह आली तर दुसरा घेतलेला द्राव आरटीपीसीआर चाचणीसाठी पाठविला जातो, औषधांची उपलब्धता ठेवली आहे, दररोज दीड लाखपर्यंत चाचण्या वाढवित आहोत अशी माहिती दिली
टेलिआयसीयू राज्यात सर्वत्र राज्यात प्रायोगिक तत्वावर टेलिआयसीयू व्यवस्था सुरु केली असून येणाऱ्या काळात याची उपयुक्तता पाहता सर्व राज्यात ही यंत्रणा उभारून विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागात शहरातील तज्ञ डॉक्टर्सचे उपचारांसाठी मार्गदर्शन घेण्याचे आम्ही ठरविले आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ऑक्सिजन उत्पादन व वितरणावर नियंत्रण हवे
राज्यात ठिकठिकाणी जम्बो सुविधा, चाचण्यांची व्यवस्था, प्रयोगशाळा उभारल्या आहेत, आम्ही न थकता लढतो आहोत आणि हरणार नाही असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासण्याची शक्यता असून केंद्राने वैद्यकीय ऑक्सिजनच्या किंमतीचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे तसेच वितरणाच्या बाबतीत देखील नियंत्रण असणे गरजेचे आहे. लस पुरवठ्याचे नियोजन हवे, लस उत्पादन लवकरात लवकर व्हावे म्हणून ट्रायलची प्रक्रिया लवकर व्हावी तसेच या लशीच्या वितरणाचे योग्य नियोजन आवश्यक आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी दिले चष्म्याच्या सवयीचे उदाहरण
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मास्कची सवय कशी अंगी बाणवावी याविषयी बोलताना चष्म्याच्या सवयीचे साधे उदाहरण दिले. ते म्हणाले की, पूर्वी जेव्हा चष्मा वापरायला सुरुवात झाली त्यावेळी त्याचा लोकांना खूप त्रास झाला असणार, तो घालणे चेहरा आणि नाकासाठी अडचणीचे झाले असणार पण नंतर तो इतका सवयीचा भाग झाला आहे की आज त्याचा त्रास होत नाही.
पंतप्रधानांना हे उदाहरण इतके आवडले की त्यांनी बैठकीच्या समारोपाच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या उदाहरणाचा  उल्लेख केला व पुढील काळात मास्क ही आपली  अपरिहार्यता आहे असे सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

16 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!