Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

गर्दी टाळून गणेशोत्सव साजरा करा : संजोग वाघेरे यांचे आवाहन

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाचा प्रादुर्भाव पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस वाढत आहे. Covid-19 चा प्रभाव रोखण्यासाठी उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सव गर्दी टाळून साजरा करावा आणि गणरायाच्या कृपेने तमाम नागरिकांवर आलेले संकट दूर व्हावे अशी प्रार्थना श्री गणराया चरणी करतो. भक्तीमय वातावरणात साजरा होत असलेला यंदाचा गणेशोत्सव कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करुन साजरा होईल. श्रीगणरायांच्या आशिर्वादाने लवकरंच शहर, राज्य कोरोनामुक्त होईल, असा विश्वास असे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

यंदाचा गणेशोत्सव एका विशिष्ट परिस्थितीत आला आहे. कोरोना सारख्या महामारी परिस्थितीमुळे शहाणपण आणि वास्तवाचे भान लोकांना समजले. यापूर्वी पाचशे ते हजार मित्रपरिवार व नातेवाईक यांना निमंत्रित करून मोठ-मोठे विवाह सोहळे पार पाडले जात होते. मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे विवाह सोहळे 50 लोकांच्या उपस्थितीत होऊ लागले. तर अनेकांना अंत्यविधी करता जाता येत नाही, तर बोटावर मोजण्याइतक्या लोकांच्याच उपस्थित करावे लागत आहेत.

Google Ad

घरातील किंवा सार्वजनिक उत्सवातील पूजनासाठी लोकांनी गर्दी करू नये. तसेच शहरात गणेश मूर्ती घेण्यासाठी अनावश्यक गर्दी टाळावी. यंदाच्या गणेश उत्सवामध्ये कोणत्याही प्रकारेेे धार्मिक दृष्ट्या बाधा येऊ नये. तसेच पारंपारिक पद्धतीनेेेे उत्सव साजरा व्हावा यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन वाघेरे यांनी केले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!