Google Ad
Editor Choice Pune District

मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात … देवासारखे धावून आले मात्र त्यांनाच हिरावून नेले … यात भाजप नगरसेवक बचावले!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १९ एप्रिल) : सोमवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. हायवे वरच्या गाड्यांच्या वेगाने अनेक अपघात होतात. मात्र अपघात झाल्यावर मदतीस धावून जाणाऱ्या देवदूतांनाच आपला प्राण गमवावा लागल्याचा प्रकार सोमवारी मध्यरात्री घडला आहे. या अपघातानंतर संपुर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या स्वीफ्ट टॅक्सीला कंटेनरने मागून धडक दिली होती. त्यांना मदत करण्यासाठी पनवेलच्या रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष सुशांत मोहिते आणि प्रथमेश बहिरा तेथं गेले होते. यादरम्यान पनवेलचे नगरसेवक तेजस कांडपिळे देखील तिथं आले. याचवेळी अचानक पनवेल नगरसेवकांच्या मर्सिडीज कारला टेम्पोने मागून धडक दिली.

Google Ad

टेम्पोने दिलेल्या धडकेमुळे देवदूतासारखे मदतीसाठी धावून गेलेल्या सुशांत आणि प्रथमेशचा जागीच मृत्यू झाला. या कारणामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. नगरसेवक तेजस कांडपिळे देखील यामध्ये जखमी झाले असून संबंधित जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर, पनवेल जवळ सोमवारी रात्री अनेक गाड्यांचा भीषण अपघात झाला आहे. या मल्टी व्हेइकल अपघातातील इतर जखमींना पनवेलच्या अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. तसेच संबंधित मृत झालेल्या सुशांतचं वय 26 वर्ष तर प्रशमेशचं वय 24 वर्ष असं होतं.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!