Google Ad
Editor Choice Maharashtra

राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय … सर्वसामान्यांना मोठा दिलासा!

महाराष्ट्र 14 न्यूज : अनलॉकचे नियम हळूहळू शिथिल होत असताना राज्य सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे . राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे . मात्र ही परवानगी फक्त एसटी बससाठी असणार आहे . जिल्ह्याबाहेर एसटी बस सेवा सुरू होणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलं आणि बससेवाही थांबवण्यात आली . त्यामुळे आपल्या मूळ गावी जाण्यासाठी आतुरलेले अनेक चाकरमानी शहरातच अडकून बसले . हक्काची लालपरीही बंद असल्याने लोकांचे मोठे हाल झाले . मात्र आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एस बस सेवेला परवानगी देण्यात आली आहे . त्यासाठी ईपासही गरज नसेल . मात्र खासगी चारचाकी वाहनांसाठी मात्र ईपास आवश्यक असणार आहे.

Google Ad

लॉकडाऊन काळात बस सेवा बंद राहिल्याने एसटी महामंडळाचं मोठं नुकसान झालं आहे . त्यामुळे प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेलपंप सुरु करीत आहे , अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी दिली.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!