Google Ad
Editor Choice Pune

BIG BREAKING : पुण्यात सोमवारपासून ‘ नियंत्रित संचार ‘ , विवाह सोहळे , हॉटेल , महाविद्यालांना बंधने … वाचा काय काय असतील निर्बंध!

महाराष्ट्र 14 न्यूज : वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात उद्या सोमवारपासून संचारबंदीचे नियम लागू करण्यात येणार आहे. पुण्यात उद्यापासून संचारबंदीचे नियम लागू करण्यात येणार असले तरी त्याला संचारबंदी न म्हणता नियंत्रित संचार असं संबोधण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कौन्सिल हॉलमध्ये कोरोना नियंत्रण आढावा बैठक घेतली. या बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार वंदना चव्हाण विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यात नियंत्रित संचार लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालयांसाठी सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.

Google Ad

2

8 फेब्रुवारीपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद

पुणे जिल्ह्यातील शाळा, कॉलेज 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी, राजकीय कार्यक्रमांसह विवाह सोहळ्याला 200 लोकांची उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. तसेच विवाह सोहळ्यासाठी पोलिसांची परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे. परवानगीसाठी सिंगल विंडो सिस्टिम सुरू करण्यात येणार आहे.

संचार बंदी
हॉटेल, लॉज, बार रेस्टॉरंट रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत इतरांसाठी नियंत्रित संचार बंदी लागू असणार आहे

Google Ad

About the author

Maharashtra14 News

53 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!