Google Ad
Editor Choice Pune District

Baramati : अजित पवार यांनी आज अधिका-यांची घेतली झाडाझडती … दिवाळीपर्यंत सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे दिले आदेश!

महाराष्ट्र 14 न्यूज : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज , बारामतीतील विकासकामांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला.भिगवण रोड विस्तारीकरण , नीरा डावा कालवा , बी.के.बी.एन . ( बारामती – कळंब – बावडा नृसिंहपूर ) रस्त्याची पाहणी केली.यावेळी हाती घेतलेल्या कामांना वेळीच मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले .

बारामती शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे भरुन रस्ते दुरुस्ती करण्याच्या सूचना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेच्या अधिका – यांना दिल्या . अनेकदा सूचना देऊनही ही कामे सुरु होत नसल्याबद्दल आज अजित पवार यांनी आपल्या शैलीत अधिका – यांना खडे बोल सुनावले . बारामती नगरपालिका हद्दीतील रस्ते नगरपालिकेने , जिल्हा परिषद हद्दीतील रस्ते जिल्हापरिषदेने व सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या हद्दीतील रस्त्यांची कामे तातडीने हाती घ्यावीत , असे पवार यांनी सांगितले .

Google Ad

दरम्यान बारामती नगरपालिकेतील डांबरीकरण व काँक्रीटीकरणाच्या ८२ कामांच्या तीन निविदांना मंजूरी मिळाली असून या सर्व कामांच्या वर्क ऑर्डर संबंधित कंत्राटदारांना दिलेल्या असून ही कामे काही ठिकाणी सुरु झाली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांनी दिली . जवळपास १४ कोटी रुपयांची ही सर्व कामे आहेत .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!