Google Ad
Editor Choice Pune District

Pune : बस प्रवासातील ओळखीतून बाळाचं अपहरण, पुण्यातील महिला अवघ्या काही तासात पोलिसांच्या ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज : बस प्रवासात झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन पुण्यात चार महिन्यांच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हडपसर पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत अवघ्या काही तासात महिलेच्या मुसक्या आवळल्या. बाळाच्या 23 वर्षीय आईने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अहमदनगर-सातारा महामार्गावरुन तक्रादार आणि आरोपी या दोन्ही महिला बसने प्रवास करुन आल्या. दोघींची बसमध्येच ओळख झाली होती. तक्रारदार तरुणीसोबत तिचे चार महिन्यांचे तान्हे बाळही होते. पुण्यात स्वारगेट बसस्थानक दोघीही उतरल्या आणि हडपसरला निघाल्या. प्रवासात झालेल्या ओळखीनंतर आरोपी महिलेने विश्वास संपादन करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. बाळाला घेऊन खायला आणण्यासाठी निघून गेली ती परत आलीच नव्हती.

Google Ad

फिर्यादी तरुणीचे नवऱ्यासोबत भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरुन तिने चार महिन्याच्या बाळाला घेऊन घर सोडले. लोणी गावात राहणारी महिला अहमदनगरला गेली. त्यानंतर तिने नगर ते सातारा बसने प्रवास सुरु केला. त्याचवेळी एक महिला त्यांच्या शेजारी सीटवर येऊन बसली. काही वेळाने आरोपी महिलेने तक्रारदार तरुणीशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. त्यांच्याशी ओळख वाढवून दोघीही स्वारगेट बस स्थानकात उतरल्या. स्वारगेट बस स्थानकात उतरल्यानंतर या दोघीही हडपसर परिसरात आल्या.

तेथील एका चायनीजच्या दुकानात दोघींनी जेवण केले. त्यानंतर आरोपी महिलेने खाऊ आणण्याचा बहाण्याने बाळाला फिर्यादी महिलेकडून स्वतःजवळ घेतले आणि ती तिथून गेली ती परत आलीच नाही. बराच वेळ झाल्यानंतर फिर्यादी महिलेने आजूबाजूच्या परिसरात त्या महिलेचा शोध घेतला असता ती सापडली नाही. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. हडपसर पोलिसांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शोध सुरु केला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी महिलेचा शोध घेतला जात आहे. बाळाचा शोध घेण्यासाठी हडपसर पोलिसांनी पथकंही तैनात केली आहेत.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!