Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

चिंता वाढतेय : पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स … गुरुवार, ०१ एप्रिल २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.०१ एप्रिल २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बुधवार ( दि.१ एप्रिल २०२१ ) रोजी २१३७ महानगरपालिका रुग्णालयात बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील २११३ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील २४ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ११६१ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – ३१४
ब – ३९९
क – २५८
ड – ३४१
इ – २०५
फ – ३११
ग – १७७
ह – १०७
एकुण – २११३

Google Ad

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे १० पुरुष पिंपरी (७०वर्षे), वाल्हेकरवाडी (५९ वर्षे), चिंचवड (५९ वर्षे), तळवडे (७६ वर्षे), निगडी (६५, ४० वर्षे), दिघी ( ३७ वर्षे), कासारवाडी (६८ वर्षे), पि. गुरव (८८ वर्षे), पिंपळे सौदागर (६९ वर्षे) : ०५ स्त्री – चिंचवड (६० वर्षे), चिखली (४६ वर्षे), निगडी (६० वर्षे), पिंपरी (८० वर्षे), काळेवाडी (७० वर्षे) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०१ पुरुष- चाकण (६७ वर्षे) ०१ स्त्री- चाकण (५४ वर्षे) येथील रहिवासी आहे.


टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात ७ मृत्यु झालेले आहेत.

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!