Google Ad
Editor Choice Pune

आगळे वेगळे देवदूत … मुलीच्या जन्माची फी न घेणाऱ्या पुण्यातील डॉक्टरच योगदान!

महाराष्ट्र 14 न्यूज : डॉक्टरे हे देवाचे दूत आहेत असे मानले जाते. या डॉक्टरांनी जर समाजसेवेसाठी काही पावले उचलली तर ती समाजासाठी आदर्श होऊ शकतात याचे उदाहरण पुणे शहरात बघायला मिळते. या शहरात एक डॉक्टर असे आहेत जे दवाखात्यात मुलीचा जन्म झाला तर ते आपली फी घेत नाहीत. पुणे येथील डॉ. गणेश राख असे या डॉक्टरचे नाव आहे. ‘मुलगी वाचवा’या मोहिमेसाठी ते स्वत:चे एक वेगळे योगदान देत आहेत.

डॉ. गणेश राख हे देशात घटत्या लिंगभेद प्रमाणाची स्थिती सुधारण्यासाठी आपले छोटसे योगदान असल्याचे मानत आहेत. समाजात मुलींपेक्षा मुलांना जन्माला घालण्याचे प्रमाण वाढत आहे. याचे कारण लिंगभेद चाचणी आहे.
२००७ मध्ये पुणे येथे रुग्णालय उघडणारे डॉ.गणेश राख हे सांगतात की, त्यांच्या रुग्णालयात एखादी गर्भवती महिला आली तर तिच्या कुटुंबियांना मुलगा व्हावा असे वाटत असते. डॉ.राख हे सांगतात की, डॉक्टरांसमोर मोठे आव्हान असते रुग्णाच्या नातेवाईकांना त्यांच्या रुग्णाचा मृत्युची माहिती देणे परंतु माझ्यासमोर त्यांच्या नातेवाईकांना मुलगी झाली हे सांगण्याचे मोठे आव्हान असते.

Google Ad

डॉ. गणेश राख यांनी ३ जानेवारी २०१२ पासून मुलगी वाचवा हे अभियान सुरु केले आहे. आणि लोकं मुलगा झाला तर उत्साह साजरा करतात परंतु आम्ही मुलगी झाली तर तिचा उत्साह रुग्णालयात साजरा करणार असल्याचे जाहीर केले. या अभियानाच्या कालावधीत रुग्णालयात आतापर्यंत ४५४ मुली जन्माला आल्या असून या मुलींच्या कुटुंबियांकडून कोणतीही फी डॉ.गणेश राख यांनी घेतलेली नाही. ज्यादिवशी लोक मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करतील त्यावेळी मी फी घ्यायला सुरुवात करेन नाहीतर मी रुग्णालय कसे चालवणार असेही ते सांगतात.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!