Google Ad
Editor Choice Maharashtra

अण्णासाहेब पाटील महामंडळ अजित पवारांकडे; राज्य सरकारने काढला आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज : मराठा समाजाच्या कल्याणासाठी कार्यरत सारथी या संस्थेपाठोपाठ आता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचा कारभारही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाकडे सोपविण्यात आला आहे. या संबंधीचा आदेश गुरुवारी काढण्यात आला.

Google Ad

सारथीचा कारभार आधी बहुजन कल्याण विभागाकडे होता. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे या विभागाचे मंत्री आहेत. मध्यंतरी सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याच्या मागणीवरून आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर सारथीचा कारभार नियोजन विभागाकडे सोपविण्यात आला. वित्त व नियोजन विभाग अजित पवार यांच्याकडे आहे.

दरम्यान, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या संस्थापन समयलेख आणि संस्थापन नियमातील नियम 82(4) मधील तरतुदीनुसार महामंडळावरील अध्यक्ष, उपाध्यक्ष, अशासकीय सदस्य व विशेष निमंत्रित यांच्या नियुक्त्या शासनामार्फत रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र महामंडळामार्फत सुरु असलेल्या योजना निरंतर सुरु राहतील, या योजनांतर्गत लाभार्थ्यांना मिळत असलेल्या व्याज परताव्याचा लाभ यापुढे देखील निरंतर देण्यात येईल, असे महामंडळामार्फत कळविण्यात आले आहे

.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!