Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

अल्पवयीन मुलावर लैंगीक अत्याचार करुन फरार झालेल्या अनोळखी आरोपीचा सलग १६ तास शोध घेऊन अटक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ जुलै) :  दिनांक १७/०७/२०२२ रोजी १७/३० वाजताचे सुमारास बापुजीबुवा उदयान , थेरगाव , पिं.चिं . पुणे येथे | खेळणाऱ्या एका ०७ वर्षाच्या अल्पवयीन मुलास चॉकलेट देण्याचे बहाण्याने अज्ञात इसमाने नेऊन सदर मुलासोबत अनैसर्गिक संभोग करुन पळुन गेला म्हणुन त्याचे पालकाने दिलेल्या तक्रारीवरून वाकड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ६१८ / २०२२ भादंवि कलम ३७७ ३६७ , ३०६ लैगिक अपराधा पासुन बालकांचे संरक्षण अधिनियम सन २०१२ चे कलम ४.६ प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे .

घडलेले गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा . श्री . अंकुश शिंदे सो , पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड यांनी श्री . सत्यवान माने , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , वाकड पोलीस स्टेशन यांना गुन्ह्याचे योग्य प्रकारे अन्वेषण करुन तात्काळ अज्ञात आरोपींचा शोध घेऊन आरोपी अटक करणेबाबत आदेशित केले . त्यानुसार श्री . सत्यवान माने यांनी त्यांचे अधिनस्थ तपास पथकातील सपोनि श्री . संतोष पाटील , सपोनि श्री . संभाजी जाधव व अमलदार यांना सुचना दिल्या . वाकड पोलीस ठाणे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांच्या वेगवेगळ्या टिम तयार करुन पिडीत मुलावर अत्याचार करणाऱ्या अनोळखी आरोपीचा शोध घेणेकरिता पिडीत मुलावर अत्याचार झाले ठिकाणाच्या आजुबाजुच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याबाबत सुचना दिल्या .

Google Ad

त्याप्रमाणे सीसीटीव्ही फुटेज चेक करून संशयित इसमाचा सीसीटीव्ही फुटेज चेक करुन माग काढण्याकरीता रात्री अविरतपणे टिम यांनी सीसीटीव्ही असणारे दुकाने , घरे यांचे मालकांना विनंती करून सीसीटीव्ही फुटेज पाहणी करुन फुटेज व्दारे आरोपी राहत असलेला परिसर | निश्चित करून सापळा रचुन संशयीत आरोपी शोध घेऊन ताब्यात घेतला . ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव अलिम मुसा शेख , चय २७ वर्षे , रा . साई मल्हार कॉलनी , तापकिर चौक , काळेवाडी , पुणे मुळगाव शिरुर ताजमल , ता . अहमदपुर , जि . लातुर असे असल्याचे सांगितले आहे . दाखल गुन्ह्याचे तपासकामी आरोपीस दिनांक १८/०७/२०२२ रोजी अटक करण्यात आली असून आरोपीकडे अधिक तपास करीत आहोत .

सदर आरोपी याचेवर पिंपरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २ ९ २ / २०२२ एन.डी.पी.सी. अॅक्ट कलम ८ ( क ) , २७ भादंवि कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे . सदर आरोपीबाबत सीसीटीव्ही फुटेज व्यतिरीक्त इतर कोणताही पुरावा नसल्याने तपास पथकातील टिमने १६ तास अविरतपणे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करीत आरोपीचा शोध घेतला आहे . 45 % सदरची कारवाई मा . श्री . अंकुश शिंदे सो . पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड , मा . श्री . संजय शिंदे सो , अपर पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड मा . श्री . आनंद मोईटे सोो , पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ , पिंपरी चिंचवड , मा . श्री श्रीकांत डिसले साो . सहा . पोलीस आयुक्त , वाकड विभाग

पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली डॉ . श्री सत्यवान | माने , वरिष्ठ पोलीस निरिक्षक , वाकड पोलीस ठाणे श्री . रामचंद्र घाडगे , श्री . संतोष पाटील , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) . | सपोनि , संतोष पाटील , सपोनि समाजी जाधव , पोउपनि अवधुत शिंगारे , पोलीस अमलदार बिभीषण कन्हेरकर , बाबाजान इनामदार , राजेंद्र काळे , बंदु गिरे , दिपक साबळे , स्वप्नील खेतले , बंडु खाडे , अतिश जाधव , प्रमोद कदम , विक्रांत चव्हाण , अतिक शेख , प्रशांत गिलबीले तात्यासाहेब शिंदे , भास्कर भारती व अजय फल्ले यांनी मिळुन केली आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!