Google Ad
Editor Choice Entertainment

पिंपरी चिंचवड च्या ‘डॉ.अंजली संदीप आवटे’ ठरल्या … ‘मिसेस इंडिया प्राईड 2022’ च्या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेच्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ जुलै) : एखाद्या सौंदर्य स्पर्धेत आपल्याला विजेतेपद मिळावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते, ते प्रत्यक्षात उतरवून विजेतेपद मिळवणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या डॉ. अंजली संदीप आवटे यांनी “मिसेस इंडिया प्राईड 2022” या राष्ट्रीय सौंदर्य़ स्पर्धेत विजेतेपदाचा मुकूट पटकवला. हा मुगुट मिळविणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील त्या पहिल्या  मानकरी आहेत. मिसेस इंडिया प्राईड 2022 ” ( Mrs India Pride 2022 ) ही राष्ट्रीय स्पर्धा नुकतीचा पुणे येथे पार पडली . देशभरातील विविध सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता . अंतिम पंधरा स्पर्धकांमधून डॉ . अंजली संदीप आवटे यांनी प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावले.

डॉ . अंजली आवटे यांचा जन्म सातारा येथे झाला, त्यांचे प्राथमिक शिक्षण पंजाब व राजस्थान येथे झाले, त्यानंतरचे शिक्षण त्यांनी शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात पूर्ण केले . गेली पंधरा वर्षे त्या एक उत्तम आयुर्वेद चिकित्सक म्हणून रुग्णसेवेत आहेत .

Google Ad

चिंचवड येथील कृष्णानगर मध्ये त्यांचे Dr Anjali’s – Rejuvna ) डॉ अंजली रिज्युवना- स्किन , हेअर , ओबेसिटी , गायनॅक क्लिनिक , या नावाने दवाखाना असून तिथे त्या सौंदर्य चिकित्सक लेझर उपचार ( Cosmetologist and Trichologist ) तज्ञ तसेच आयुर्वेद चिकित्सक म्हणून काम पाहतात.कुटुंब व मुलांना प्राधान्य देत , स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सांभाळत त्यांनी अशा प्रकारच्या विजेतेपद मिळवण्याचे लहानपणीचे स्वप्न आज “मिसेस इंडिया प्राईड 2022 ” ( Mrs India Pride 2022 ) हा बहुमान मिळवत पूर्ण केले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्या आई वडीलांना , तसेच त्यांच्या सर्व कुटुंबियांना फार अभिमान आहे, असे त्या म्हणाल्या.

या स्पर्धेचे आयोजन दि. १६ जुलै रोजी पुणे येथील 3D Destination येथे करण्यात आले होते. स्पर्धेचे आयोजक SIPA Entertainment व J4E होते व त्यांच्या वतीने संपूर्ण कार्यक्रमाचा कार्यभार आयोजक साहिल शहा व अपूर्वा शहा यांनी तसेच ऑफिशियल ग्रुमिंग पायल प्रामाणिक यांनी केले . प्रसिद्ध फॅशन डिझाईनर जाझ शेख खान व कल्पना दुआ यांनी परीक्षक म्हणून काम केले, प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सिने अभिनेते मिलींद गुणाजी यांच्या उपस्थितीत हा संपूर्ण कार्यक्रम पार पडला .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement