Google Ad
Editor Choice

छ्ठ पूजा उत्सवासाठी पवना नदी घाट सज्ज; घाटाची पिंपरी चिंचवड मनपा अधिकाऱ्यांकडून पाहणी..

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ ऑक्टोबर) : उत्तर भारतीय बांधवांच्या दोन दिवसीय छ्ठ पूजा उत्सवास उद्या रविवारपासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने घाट परिसरात स्वच्छता, निर्माल्य व्यवस्था व इतर आवश्यक बाबी पुरवाव्यात, अशी मागणी हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा छठ पूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली होती.

त्या मागणीची दखल घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी चिंचवड गावातील पवना नदीवरील घाटास प्रत्यक्ष भेट देत कामांचा आढावा घेतला. त्यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, प्रभाग अधिकारी, छठ पूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते खंडूशेठ चिंचवडे, शशिकांत श्रीवास्तव, जे जे गुप्ता, मुन्ना गुप्ता, दुर्लमप्रसाद गुप्ता, मदनरमई प्रसाद गुप्ता, मनीष लक्ष्मण गुप्ता व आदी उपस्थित होते.

Google Ad

छठ पूजा समितीचे कार्याध्यक्ष विजय गुप्ता म्हणाले, नोकरी, उद्योग, व्यवसायानिमित्त बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश येथून आलेले नागरीक पिंपरी चिंचवड शहरात अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. हे उत्तर भारतीय बांधव दरवर्षी शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात छट उत्सव साजरा करतात. चिंचवडगावातील पवना नदीच्या घाटावर हनुमान मित्र मंडळाच्या वतीने हा उत्सव साजरा केला जातो. रविवारी (दि. ३०) आणि सोमवारी (दि. ३१) रोजी मोठ्या प्रमाणात छट उत्सव साजरा करण्यात येणार आहे. गतवर्षीप्रमाणे या वर्षी देखील पवना नदीच्या घाटावर भव्य गंगा आरती आणि पूजा, भजन, छट लोकगीत असे विविध धार्मिक, सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. या धार्मिक उत्सवात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विजय गुप्ता यांनी केले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!