Google Ad
Editor Choice

आमदार ‘लक्ष्मणभाऊ जगताप’ यांच्या वाढदिवसानिमित्त … ओम साई फौंडेशनच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण!

महाराष्ट्र 14 न्यूज : आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले . यामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा, फॅशन शो, सांस्कृतिक कार्यक्रम, शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

नवी सांगवीतील ओम साई फाउंडेशन तर्फेही असाच एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला, चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी नेहमीच आपले योगदान दिले, त्याचप्रमाणे आपणही समाजाचे काहीतरी देने लागतो या हेतूने ओम साई फौंडेशनच्या वतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण अध्यक्ष संजय मराठे यांच्या कडून व मा.नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह आवारात करण्यात आले .

Google Ad

यावेळी माऊली जगताप , नगरसेविका सविता खुळे , नगरसेवक सागर आंगोळकर , संतोष कांबळे , बाबा त्रिभुवन , गोपाळ माळेकर सामाजिक कार्यकर्ते विनोद तापकीर , धनंजय ढोरे , मिलिंद कंक , कृष्णा भंडलकर आदी मान्यवर उपस्थित होते .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!