Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

कुणाल आयकॉन रस्त्याला पर्यायी रस्ता लवकरच वाहतुकीसाठी होणार खुला … नगरसेविका ‘निर्मलाताई कुटे’ यांनी घेतला स्मार्ट सिटीच्या कामाचा आढावा!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपळे सौदागर कुणाल आयकाॅन रस्त्यावरुन जगताप डेअरी (साई चौक) कडे जाणाऱ्या वहातुकीला पर्यायी रस्ता उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रयत्नांमधून आणि नगरसेविका निर्मला कुटे व नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या पाठपुराव्यानुसार सैन्य दलाच्या (Army land) हद्दीलगत १८ मीटर रुंद रस्त्याचे कामस्मार्ट सिटी अंतर्गत दि.१८ मे २०२० रोजी सुरु करण्यात आले होते.

सदर १२०० मीटर रस्त्याचे काम बी. जी. शिर्के कंपनीच्या माध्यमातुन पुर्ण होत असुन शनिवार दि. ०६/०३/२०२१ रोजी नगरसेविका निर्मला कुटे यांनी या रस्त्यावरील स्ट्राॅम वाॅटर लाईन, ड्रेनेज लाईन, सर्व्हिस लाईन, वाॅटर लाईन, फुटपाथ, इलेक्ट्रिक पोल, सिमेंट काँक्रीट व रस्ता सुशोभिकरणासाठी करण्यात येणाऱ्या संपुर्ण कामाचा आढावा घेतला यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्मार्ट सिटी विभागाचे प्रमुख अधिकारी सेठिया साहेब, कोल्हे व मे. बी. जी. शिर्के कंपनीचे चव्हाण उपस्थित होते.

Google Ad

तसेच याप्रसंगी निर्मलाताई कुटे यांनी संबंधित सोसायटींच्या मागील गेट समोरील काँक्रीटचे काम पुर्ण करुन सदर सोसायटींची वाहतुक नवीन रस्त्याला जोडुन सदरचा रस्ता पुढील २ महिन्यांमध्ये (माहे मे-२०२१ पर्यंत) सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!