Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शासकीय व खाजगी आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणार कोविड-१९ प्रतिबंधक लस … अशी करा नोंदणी!

महाराष्ट्र 14 न्यूज , दि .१५ जाने. २०२१ : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड -१ ९ वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी शासनानकडून कोविड -१ ९ लसीकरण दि .१६ जानेवारी २०२१ पासून सुरू करण्याबाबत सुचना प्राप्त झालेल्या आहेत . सदरची लस आरोग्य सेवा देणा – या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना प्राधान्याने देण्यात येणार आहे . कोविड १९ लसीकरण नियोजनासाठी भारत देशातील सर्व शासकिय व खाजगी आरोग्य सेवा कर्मचारी ( HCW ) यांची माहिती अहवाल ( डाटाबेस ) संकलन करण्यात आलेले आहे.

पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व खाजगी वैद्यकिय व्यवसायिक , इंडियन मेडिकल असोशिएशन ( IMA ) , नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोशिएशन ( NIMA ) , पिंपरी चिंचवड डॉक्टर असोशिएशन ( PCDA ) , दंततज्ञ संघटना , पॅथोलॉजिस्ट संघटना , नर्सेस असोशिएशन , फार्मासिस्ट असोशिएशन यांना कोविड -१ ९ प्रतिबंध लस घेण्याबाबतची नोंदणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्मार्ट सारथी ऍप वर भरणेकामी यापुर्वीही आवाहन करण्यात आलेले असून अद्याप ही ज्या आरोग्य कर्मचारी यांची नोंदणी केलेली नाही त्यांची नोंदणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्मार्ट सारथी ऍप वर तातडीने करावी .

Google Ad

दि .१६ जानेवारी २०२१ रोजी नोंदणीकृती आरोग्य सेवा देणा – या सेवकांना कोविड -१ ९ लसीकरण करण्यात येणार असून याकामी आज दि .१५ जानेवारी २०२१ रोजी महापालिकेचे वैद्यकिय विभागातील अधिकारी , खाजगी वैद्यकिय व्यवसायिक व इंडियन मेडिकल असोशिएशन ( IMA , PCB ) वैद्यकिय व्यवसायिक संघटना यांचे समवेत गुगल मीट व्दारे वेबिनार सभा झालेली आहे . त्याअनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकिय विभागाकडून आवाहन करण्यात येते की , नोंदणीकृत लाभार्थीना कोविड -१ ९ लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या मोबाईलवर मॅसेज आल्यानंतर महापालिकेच्या संबंधीत लसीकरण केंद्रावर जाऊन कोविड -१ ९ लसीकरण करुन घ्यावे, असे महानगरपालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!