Categories: Editor Choice

दिल्लीत ‘आप’ दणका! अरविंद केजरीवाल यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०८ फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे ट्रेंड येऊ लागले आहेत. यावेळी दिल्लीच्या ७० विधानसभा जागांपैकी ‘नवी दिल्ली’ जागा सर्वात जास्त चर्चेत आहे.

नवी दिल्ली मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला असून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. भाजपाची २७ वर्षांनी सत्ता येणार हे निश्चित झालं आहे. आम आदमी पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आम आदमी पक्षाचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे.

भाजपचे परवेश प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर मात केली. अरविंद केजरीवाल यांचा जवळपास १२०० मतांनी पराभव झाला आहे. याआधीच आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही पराभवाचा समना करावा लागला आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपच्या परवेश वर्मा यांनी त्यांचा १२०० मतांनी पराभव केला आहे. केजरीवालांसारख्या राष्ट्रीय नेत्याचा पराभव करुन परवेश वर्मा हे जायंट किलर ठरले आहेत. अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून ते रिंगणात उतरले होते. याठिकाणी त्यांच्यासमोर भाजपच्या परवेश वर्मा आणि काँग्रेसच्या संदीप दिक्षीत यांचे आव्हान होते.

अरविंद केजरीवाल यांना १० व्या फेरीपर्यंत एकूण २०,१९० मते मिळाली होती. तर प्रवेश वर्मा यांना २२,०३४ मते मिळाली होती. प्रवेश वर्मा हे अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा १८४४ मतांनी आघाडीवर होते. तर तिसऱ्या नंबरवर संदीप दीक्षित आले आहे त्यांना ३५०३ मते मिळाली आहेत. सुरुवाती पासूनच अरविंद केजरीवाल प्रवेश वर्मा यांच्या मागे होते

Maharashtra14 News

Recent Posts

रहाटणी प्रभागातील गजानन नगरमधील नागरिकांना पाण्याच्या समस्येपासून दिलासा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ एप्रिल : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रहाटणी प्रभागातील गजानन नगर परिसरामध्ये नागरिकांना…

3 days ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध; कोणताही रुग्ण रक्ताविना परत नाही

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तकेंद्रात पुरेसा रक्तसाठा उपलब्ध; कोणताही रुग्ण रक्ताविना परत…

3 days ago

केंद्राचा नवा प्लॅन! … महाराष्ट्राच्या राजकारणात गणिताचा खेळ बदलत, लोकसभेच्या २४ आणि विधानसभेच्या १०० जागा वाढणार?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि०७ एप्रिल :  16 एप्रिल रोजी लोकसभेचे एक विशेष अधिवेशन बोलावण्यात आले…

4 days ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; … २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली

आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे…

1 week ago

राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर पिंपरी-चिंचवडला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत! … प्रशांत शितोळे

महाराष्ट्र 14 न्यूज, दि २९ मार्च : पिंपरी-चिंचवड शहराला खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ आणि सोयीसुविधांनी युक्त…

2 weeks ago

SIR म्हणजे काय? SIR यादीत (मतदार यादी) नाव आहे की नाही? पहा कसं चेक करायचं?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२९ मार्च : पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत सध्या राज्यभरात…

2 weeks ago