Categories: Uncategorized

रहाटणी प्रभागातील गजानन नगरमधील नागरिकांना पाण्याच्या समस्येपासून दिलासा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०७ एप्रिल : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रहाटणी प्रभागातील गजानन नगर परिसरामध्ये नागरिकांना भेडसावत असलेल्या पाण्याच्या कमी दाबाच्या समस्येचे अखेर समाधान करण्यात आले आहे. या भागात नवीन (कमी दाबाच्या) जलवाहिनीला जुन्या मुख्य जलवाहिनीशी जोडण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.

नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेत आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे ही समस्या अल्पावधीत मार्गी लागली असून, आता नागरिकांना नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे.

या कामामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यातही अशाच प्रकारे नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल असे बाबासाहेब ज्ञानोबा त्रिभुवन यावेळी बोलताना सांगितले.

याप्रसंगी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता ऋषिकेश गेंगजे, कनिष्ठ अभियंता समीक्षा मालपुरे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

2 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago