Categories: Sports

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते सांगवी येथे आमदार चषक २०२५” उद्घाटन समारंभ

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०८ फेब्रुवारी : लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात येत असलेली पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात मोठी आणि दिमाखदार असलेली भव्य फुलपीच डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा “आमदार चषक २०२५” स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे  यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. तसेच याप्रसंगी मा.चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद देखील लुटला.

यावेळी बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले, “अशा स्पर्धांच्या माध्यमातून आपल्या शहरातील खेळाडूंनी जगाच्या पाठीवर क्रीडाक्षेत्रात भरारी घ्यावी हिच आम्हा सर्वांची इच्छा आहे. याच भावनेतून हि स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते. उद्योगनगरी आणि स्मार्टसिटी बरोबरच या शहराला क्रीडानगरी हि ओळख मिळावी याकरिता आम्ही सर्वजण सातत्याने प्रयत्नशील असतो”. यापुढील काळात देखील या स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करून खेळाडूंच्या क्रीडाकौशल्याला वाव देण्यासाठी आम्ही सदैव कार्यरत राहील अशी ग्वाही यावेळी दिली.

सर्व खेळाडूंनी दरवर्षीप्रमाणे शिस्तप्रिय तसेच उत्कृष्ट क्रीडाशैलीने प्रदर्शन करून या स्पर्धेची लोकप्रियता आणि परंपरा जपावी अशी विनंती केली. तसेच स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री.अजय दुधभाते, श्री.निलेश जगताप, श्री.मनीष कुलकर्णी,श्री.प्रवीण वाघमोडे यांच्यासह सर्व संघांचे संघमालक आणि खेळाडूंचे आमदार शंकरभाऊ जगताप यांनी आभार मानले आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भाजपा नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.भाजपा सदस्यता अभियान संघटनपर्वात पिंपरी चिंचवड शहरातील मा.उपमहापौर श्री. सचिनजी चिंचवडे यांनी महाराष्ट्रात प्रथमच सर्वाधिक २००० सदस्यता नोंदणी केल्याबद्दल आणि भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी १००० सदस्यता नोंदणी केल्याबद्दल बावनकुळेजी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

3 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

1 month ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago