Google Ad
Editor Choice Maharashtra Music

आळंदी येथे ‘आम्ही वारकरी’ संस्था आयोजित … राज्यस्तरीय वारकरी कीर्तन सादरीकरण स्पर्धा … कसे, व्हाल सहभागी? काय आहेत नियम, अटी वाचा सविस्तर!

महाराष्ट्र 14 न्यूज : शुद्ध सांप्रदायिक कीर्तनासाठी आळंदी येथील ‘आम्ही वारकरी’ परिवार सदैव आग्रही असतो, चांगल्या सांप्रदायिक तरुण किर्तनकारांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मागील वर्षांपासून कीर्तन स्पर्धा आयोजित करत आहे . मागील वर्षीच्या स्पर्धेला सर्वांचे उत्तम सहकार्य व प्रचंड प्रतिसाद लाभला होता . या वर्षीच्या स्पर्धेची माहीती आपल्या संपर्कातील अधिकाधिक तरुण किर्तनकारांपर्यंत पोहचवण्याचा परिवाराचा प्रयत्न आहे .

संत नामदेव महाराजांनी ‘ वारकरी कीर्तनाची मुहूर्तमेड रोवली . वारकरी कीर्तनाची सुमारे ८०० वर्षांची समृध्द परंपरा आहे . ‘ कीर्तन ‘ ही भक्ती आणि भागवत धर्म प्रसाराचे सर्वात प्रभावी माध्यम आहे . महाराष्ट्राच्या सामाजिक , राजकीय , धार्मिक जागृतीत ‘ वारकरी कीर्तनांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे . आजकाल या वारकरी कीर्तनांच्या शुध्द सांप्रदायिक चौकटीला धक्का लागण्याची भिती निर्माण झाली आहे . कीर्तनातील निरुपण आणि भजन हे दोन्हीही लोकरंजनाकडे वळण्याचा धोका निर्माण झाला आहे . नव्या पिढीला शुध्द सांप्रदायिक वारकरी कीर्तनाची चौकट कळावी व त्या चौकटीत वारकरी कीर्तन करण्याला प्रोत्साहन मिळावे , या उद्देशाने ‘ आम्ही वारकरी ‘ संस्थेकडून राज्यस्तरीय वारकरी कीर्तन सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . ही स्पर्धा दिनांक ९ आणि १० एप्रिल २०२१ रोजी श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे होणार आहे .

Google Ad

🔴स्पर्धेच्या नियम व अटी :
१ ) कीर्तनकारांचे वय वर्षे ३० ( तीस ) पेक्षा कमी असावे .
२ ) सादरीकरणाला वेळ ४५ मिनिटे असेल .
३ ) संयोजकांनी दिलेल्या १० अभंगापैकी एक अभंगावर निरुपण करणे आवश्यक आहे .
४ ) हिंदी व इंग्रजी भाषेत निरुपणा करणान्या कीर्तनकारांना विशेष पारितोषिक दिले जाईल .
५ ) फक्त अंतिम फेरीसाठी २० कीर्तनकारांना प्रवेश दिला जाईल . ६ ) प्रवेश विनामुल्य आहे .
७ ) वारकरी संप्रदायातील मान्यवर , निष्ठावंत वारकरी कीर्तनकार या स्पर्धेचे परिक्षण करणार असून परिक्षकांचा निर्णय अंतिम व सर्वमान्य असेल .
८ ) परीक्षण करतांना अभंगाचे निरुपण , सांप्रदायिक चाली , श्रोत्यांचा प्रतिसाद , सात्विक वेशभूषा , वक्तृत्व इ . मुद्दे विचारात घेतले जातील . शुध्द वारकरी सांप्रदायिक चौकटीत कीर्तन करणे आवश्यक आहे .
९ ) वारकरी संतांशिवाय इतर कुणाचीही रचना कीर्तनामध्ये गाता येणार नाही .
१० ) रुपाचा अभंग , मधले भजन , चाल आपापल्या फडाच्या परंपरेप्रमाणे घेण्यास कोणतीही हरकत नाही .

🔴कसे सहभागी व्हाल ?
इच्छुक स्पर्धकांनी ९७६३७२९०१२ या मोबाईल क्रमांकावर आपले पुर्ण नाव , पत्ता , शिक्षण , संपर्क क्रमांक , सांप्रदायिक शिक्षण , घरात वारीची परंपरा आहे का ? इ . माहिती पाठवावी . कोणत्याही अभंगावरील आपले निरुपण असणारी ५ मिनीटांची ऑडीओ / विडीओ क्लिप ९७६३७२९०१२ या व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवावी .
आलेल्या सर्व ऑडीओ / व्हिडीओ क्लिप मधुन २० कीर्तनकारांना अंतिम फेरीसाठी आमंत्रित करण्यात येईल , त्यांच्या निवास , भोजन य प्रवास खर्चाची सोय आम्ही वारकरी ‘ च्या वतीने करण्यात येईल .

🔴अशी असतील पारितोषिके :
क्रमांक प्रथम २५,००० / -रुपये शाल , श्रीफळ , सन्मानचिन्ह
द्वितीय क्रमांक २०,००० / -रुपयेशाल , श्रीफळ , सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक १५,००० / – रुपये शाल , श्रीफळ , सन्मानचिन्ह
प्रोत्साहनपर प्रथम क्रमांक ५,००० / – रुपये शाल , श्रीफळ , सन्मानचिन्ह
प्रोत्साहनपर द्वितीय क्रमांक ५,००० / -रुपये शाल , श्रीफळ , सन्मानचिन्ह
प्रोत्साहनपर तृतीय क्रमांक ५,००० / – रुपये शाल , श्रीफळ , सन्मानचिन्ह

🔴प्रवेशिका स्विकारण्याची अंतिम तारीख २० फेब्रुवारी २०२१  

संपर्क :-
राजाभाऊ चोपदार – ९८२२३१८३७५   

रामभाऊ चोपदार –९७६३७२९०१२

सचिन पवार – ९९२२७७८०४४

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!