Google Ad
Editor Choice Maharashtra

A. Nagar : इंदुरीकर महाराजांच्या खटल्यासाठी झाली नवीन सरकारी वकिलाची नियुक्ती!

महाराष्ट्र 14 न्यूज : प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी किर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर इंदुरीकर महाराजांच्या विरोधात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्यांतर्गत संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल झाला होता. दरम्यान, संगमनेरच्या सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातील सरकारी वकील ॲड.बी.जी.कोल्हे यांनी आपले वकील पत्र मागे घेतले होते.

या खटल्यातील इंदुरीकरांच्या वकिलांशी सरकारी वकिलांचा भावाच्या खटल्यानिमित्त संबंध येत असल्याचा आरोप झाल्याने कोल्हे यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे आता यासाठी ॲड.अरविंद राठोड यांची नियुक्ती केल्याची माहिती न्यायालय अधीक्षकांनी दिली. काल होणार असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता या खटल्याची सुनावणी २ डिसेंबरला होणार आहे. दरम्यान, इंदुरीकर महाराज यांच्या वादग्रस्त विधानाचे व्हिडिओ सोशल माध्यमांवर झळकले होते.

Google Ad

या विधानामुळे त्यांच्याविरोधात घुलेवाडीच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर भवर यांनी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये १९ जून रोजी संगमनेर न्यायालयात खटला दाखल केला होता. दरम्यान, या प्रकरणात सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील बी.जी.कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर इंदुरीकरांतर्फे ॲड.के.डी.धुमाळ तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे रंजना गवांदे बाजू मांडत आहेत.

मागील तारखेला कोर्टाचे कामकाज झाले नसले तरी कोर्टाबाहेर काही घडामोडी पहायला मिळाल्या होत्या. या प्रकरणातील सरकारी वकिलांच्या भावाविरुद्ध संगमनेरच्याच न्यायालयात एक खटला सुरू आहे. इंदुरीकरांची बाजू मांडणारे सरकारी वकिलाच्या भावाचाही खटला चालवित असल्याचे उघड झाले होते. न्यायिक तत्वानुसार असे चालत नाही. त्यामुळे सरकारी वकील कोल्हे यांनी या खटल्यापासून स्वत:ला बाजूला करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता ॲड.अरविंद राठोड यांची नियुक्ती केल्याची माहिती न्यायालय अधीक्षकांनी दिली आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!