महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ फेब्रुवारी) : महापालिकांच्या निवडणुकीची जबाबदारी प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत शुक्रवारी (ता.२५) निश्चीत करण्यात आली. त्यानुसार पक्षाची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या भौगोलिक क्षेत्रात होणाऱ्या आगामी महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख पदी श्री शंकर पांडुरंग जगताप व सहाय्यक पदी श्री संतोष गुलाब कलाटे यांची नियुक्ती केली आहे.
पालिकेच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची जबाबदारी शंकर जगताप यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. आज (दि.२६) त्यांचा सत्कार कृष्णा चौक येथील भाजप कार्यसल्यात सांगवी काळेवाडी मंडल च्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी भाऊसाहेब जाधव, सुनील कोकाटे, नागेश जाधव, सखाराम रेडेकर,राजू नागणे, गणेश बनकर, संदीप दरेकर, माऊली जगताप, शिरीष कवडे, संतोष पाटील, सोनू कवडे, प्रवीण पाटील, साईश कोकाटे उपस्थित होते.
यावेळी बोलताना शंकर जगताप म्हणाले, भारतीय जनता पक्षाने नेहमी सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे राहुन त्यांच्या कामास प्रथम प्राधान्य दिले आहे, आणि यापुढील काळात ही ते देण्यात येईल. पिंपरी चिंचवड महापालिकेत पुन्हा भाजपच (BJP) सत्तेत येणार असून शंभर प्लस नगरसेवक निवडून येतील, शहराचा एकूण आढावा घेता, आमचे शंभर प्लस नगरसेवक निवडून येणार, असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला.