Google Ad
Editor Choice Maharashtra

Breaking News : महाड शहरात ५ मजली ईमारत कोसळली , शेकडो लोकं ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

महाराष्ट्र 14 न्यूज : महाड शहरात पाच मजली ईमारत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. काजलपूरा भागात असलेल्या तारीक गार्डन असं या ईमारतीचे नाव आहे. ७० ते ८० हून अधिक माणसे ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत १० लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. १० वर्ष जुनी ही इमारती असल्याची माहिती मिळत आहे. ईमारत कशामुळे कोसळली याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

या इमारतीत ४७ फ्लॅट्स होते. जवळपास २०० ते २५० जण या इमारतीत राहत असल्याची माहिती आहे. लोकांना ढिगाऱ्याखालून काढण्याचं काम सुरु आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचण्यासाठी निघाली आहे. अशी माहिती काँग्रेस नेते माणिक जगताप यांनी दिली आहे. पोलीस आणि शासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरु आहे.

Google Ad

‘जवळपास २० ते २५ लोकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. दुर्घटना मोठी आहे.’ अशी माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे. ईमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. प्रशिक्षित लोकांच्या मदतीने मदतकार्य केलं जात आहे. लोकांना सुखरुप बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

70 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!