Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

सोलापूर सोशल फौंडेशन आणि ग्लोबल इंडिया फौंडेशनने दिला … पिंपरी चिंचवड मनपा रुग्णांलयास डाबर कंपनीचा १० टन इम्युनिटी ज्युस!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि .२० ऑगस्ट : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग व फैलाव लक्षात घेता विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत . शहरातील कोविड १९ रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन व ग्लोबल इंडिया फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आलेले डाबर कंपनीचे इम्युनिटी ज्युस महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांमध्ये मोफत देण्यात येणार असल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली . यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे , सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके , तसेच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील आदी उपस्थित होते .

मा.आ.सुभाष देशमुख ( माजी सहकार , पणन व वस्त्रोद्योग मंत्री ) यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या सोलापूर सोशल फाऊंडेशन तसेच भारतभर सामाजिक कार्यात अग्रेसर ग्लोबल इंडिया फाऊंडेशन संस्थेकडून महापालिकेस कोविड -१९ रुग्णांची इम्युनिटी वाढविण्यासाठी डाबर कंपनीचे आवळा , मोसंबी , संत्रे अशा विविध पद्धतीचे १० टन इम्युनिटी ज्युस मोफत दिले आहेत . पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव वाढत आहे . त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे . त्यादृष्टीने महापालिकेकडून विविध पातळ्यांवर नियोजन व व्यवस्थापन करण्यात येत असल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

Google Ad

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

65 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!