Categories: Uncategorized

महायुतीचा धर्म पाळणार, चिंचवड विधानसभेच्या विकासासाठी शंकर जगताप यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार – नाना काटे

महाराष्ट्र 14 न्यूज, ४ नोव्हेंबर २०२४ – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार नाना काटे यांचे बंड शमविण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनाही यश आले आहे. त्यामुळे नाना काटे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

आज (दि. ४) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे महायुतीतील बंडखोर उमेदवार नाना काटे हे आपला उमेदवारी अर्ज माघारी घेणार का, याबाबत अनेक तर्क- वितर्क लावण्यात येत होते. दुपारी महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी नाना काटे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर दोघांनी एकत्र येऊन नाना काटे यांच्या उमेदवारी माघारीचा निर्णय जाहीर केला.

यावेळी बोलताना नाना काटे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली होती. तसेच आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोन आला होता. दोघांच्याही विनंतीला मान देऊन आणि आमच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी आज उमेदवारी अर्ज माघारीचा निर्णय घेतला आहे. यापुढे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीचा धर्म पाळणार असून शंकर जगताप यांच्या विजयासाठी जोमाने काम करणार आहोत.

यावेळी बोलताना महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी नाना काटे यांच्या माघारीच्या निर्णयाचे स्वागत केले. राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा यावे, यासाठी नाना काटे व राष्ट्रवादी काँग्रेस मधील त्यांच्या सहकाऱ्यांनी सामंजस्याची  भूमिका घेतल्याबद्दल महायुतीचा उमेदवार या नात्याने मी त्यांना धन्यवाद देतो, असे जगताप म्हणाले.

त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, विनोद नढे, संतोष कोकणे, विजू अण्णा जगताप, राजेंद्र साळुंखे, मनोज खानोलकर, नवनाथ नढे, श्याम जगताप, तानाजी जवळकर, शिरीष साठे, नीलेश डोके, हरिभाऊ तिकोने, यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

भरपावसात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान; मुख्यमंत्री फडणवीसांनी आमदार शंकर जगताप यांच्यासह खेळली फुगडी

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान…

2 weeks ago

तळेगाव दाभाडे येथील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेत 4 मृत्यू तर 51 जखमी..!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ जून : तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन हद्दीतील कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी…

2 weeks ago

आकुर्डी येथील पालखी मुक्कामाच्या ठिकाणाची व वारकरी भवनाच्या नियोजित जागांची आयुक्तांकडून पाहणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी, २ जून २०२५) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी…

4 weeks ago

छत्रपती कारखान्याचा कारभार दोन वर्गमित्रांकडे … जाचक नवे अध्यक्ष; तर कैलास गावडे नवे उपाध्यक्ष !

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मे : इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत…

1 month ago