Google Ad
Editor Choice Maharashtra

महाराष्ट्रात आज काय म्हणतेय कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी …

महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यात २,२९४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १९,९४,९७७ झाली आहे. राज्यात ४८,४०६ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ५० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५०,५२३ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३ टक्के एवढा आहे.

राज्यात आज ५० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ८, ठाणे ३, नाशिक ३, अहमदनगर ३, पुणे ४, सोलापूर ३, यवतमाळ ४, नागपूर ७, वर्धा ३ व अन्य ३ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ५० मृत्यूंपैकी ३५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १० मृत्यू वर्धा ३, यवतमाळ २, कोल्हापूर १, नागपूर १, नांदेड १, पुणे १ आणि ठाणे १ असे आहेत.

Google Ad

आज ४,५१६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १८,९४,८३९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९८ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३८,९५,२७७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,९४,९७७ (१४.३६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,१८,०५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,९९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!