Categories: Uncategorized

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ड क्षेत्रीय कार्यालयाकडून मतदारांना वॉशिंग मशीन वाटप करताना १९ वॉशिंग मशीन जप्त…..

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १३ जानेवारी २०२६ :* पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ड क्षेत्रीय कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकाने रहाटणी येथील गणराज कॉलनी येथे १९ वॉशिंग मशीन जप्त केल्या आहेत. १२ जानेवारी २०२६ रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत भरारी पथकाचे प्रमुख राहुल निकम यांनी काळेवाडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षाची एसएसटी, एफएसटी, व्हीएसटी अशी विविध पथके महापालिका हद्दीत कार्यरत आहेत.

१२ जानेवारी रोजी रात्री १०.२३ वाजता आचारसंहिता कक्षाला रहाटणी येथील गणराज कॉलनी येथे मतदारांना वॉशिंग मशीन वाटप केले जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर तातडीने राहुल निकम यांच्या नेतृत्वाखालील एफ.एस.टी. भरारी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तेथे एका गाडीमध्ये (क्र. एमएच १४ केए ६३३०) जवळपास १९ वॉशिंग मशीन असल्याचे आढळून आले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; … २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली

आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे…

5 days ago

राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर पिंपरी-चिंचवडला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत! … प्रशांत शितोळे

महाराष्ट्र 14 न्यूज, दि २९ मार्च : पिंपरी-चिंचवड शहराला खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ आणि सोयीसुविधांनी युक्त…

6 days ago

SIR म्हणजे काय? SIR यादीत (मतदार यादी) नाव आहे की नाही? पहा कसं चेक करायचं?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२९ मार्च : पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत सध्या राज्यभरात…

7 days ago

सर्वसामान्यांना महागाईत मोठा दिलासा …! १ एप्रिलपासून वीज दरात कपात, प्रति युनिटमागे किती रुपये द्यावे लागणार?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मार्च : सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी नवीन आर्थिक…

1 week ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला नगरसदस्यांच्या उपस्थितीत शहरातील उत्कृष्ट महिला बचत गटांचा विशेष सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, १७ मार्च २०२६ :-* महिलांचे योगदान समाजासाठी खूप मोठे आहे. एक महिला…

3 weeks ago

अखेर पिंपरी चिंचवडला मिळाले पुण॔वेळ आयुक्त … डॉ. विजय सूर्यवंशी महापालिकेचे नवे आयुक्त

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.११ मार्च : राज्यात आज बुधवारी पुन्हा एकदा बड्या आयएएस अधिकाऱ्याची महत्वाच्या…

4 weeks ago