Categories: Uncategorized

– तीन राज्यातील विजयाचा पिंपरी-चिंचवडमध्ये आनंदोत्सव … पंतप्रधान मोदींवरील विश्वास अन्‌ विकास हेच भाजपाच्या विजयाचे सूत्र! – भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३ डिसेंबर) : देशवासीयांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेला विश्वास आणि केलेला विकास हेच भाजपाच्या विजयाचे सूत्र आहे. मोदींवर सर्वसामान्य जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवत भाजपाला राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन ठिकाणी झालेल्या निवडणुकांमध्ये दमदार विजय मिळवून दिला. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील भाजपाचे ४५ हून अधिक खासदार आणि देशातील ३५० हून अधिक खासदार निवडून येतील. विजयाची ही मालिका कायम राहील, असा विश्वास भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केला.  

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यामध्ये झालेली निवडणुकीचा निकाल हाती आला. यामध्ये भाजपाचे दमदार कामगिरी करीत बहुमत मिळवले आहे. यानिमित्त पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे मोरवाडी येथील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यलयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी शहराध्यक्ष जगताप बोलत होते.

यावेळी, भाजपा वरिष्ठ उपाध्यक्ष व प्रवक्ते राजू दुर्गे, सरचिटणीस विलास मडिगेरी, संजय मगोडेकर, अजय पाताडे, नामदेव ढाके, पिंपरी विधानसभा अध्यक्ष अमित गोरखे, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे,युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, प्रदेश सचिव कविता हिंगे, उपाध्यक्ष आशा काळे, सचिव राजश्री रायभाय, अभिजित बोरसे, समीर जावळकर,  उपाध्यक्ष बिभीषण चौधरी, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस धनराज बिरदा, महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली खाड्ये, माजी नगरसेवक सागर आंगोळकर, शारदा सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे, गोपाळ मंडल, जयेश चौधरी, सुधीर साळुंखे, प्रसाद कस्पटे, वीणा सोनवलकर, दीपक भंडारी, राजन गुंजाळ, खेमराज काळे, गणेश ढाकणे, चैतन्य देशपांडे, बेटी बचाव बेटी पढाव प्रकोष्ठच्या प्रीती कामतिकर, माजी नगरसेविका अश्विनी बोबडे, सदस्या सुनीता खराडे, प्रज्ञा हीतनाळेकर, सीमा चव्हाण, संतोष भालेराव आदी उपस्थित होते.

शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने या निवडणुकीला महत्व प्राप्त झाले होते. विरोधकांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखविताना भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात मतदान केले. या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी देखील वाढली होती. यामुळे अनेक भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या फरकाने आपल्या प्रतीस्पर्ध्याना पराभूत केले आहे. जनमताचा हा कौल मोदींच्या बाजुने आहे.
***
देशातील नागरिकांनी भारतीय जनता पक्षाच्या विकासात्मक धोरणाला पसंती दिली असून, आगामी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपा मोठा विजय प्राप्त करेल. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यात भाजपाने बहुमत मिळवले. तेलंगणा राज्यामध्येही भारतीय जनता पार्टीचा मतदानाचा टक्का वाढून तेथील भाजपाच्या मते वाढलेली आहेत. तसेच, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अचूक निवडणूक व्यवस्थापन हा या निवडणुकीतील विजयाचा पाया ठरला आहे. विकासाच्या मुद्यांवर आणि मोदींच्या नेतृत्त्वावर मतदारांचा विश्वास आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ३५० हून जास्त खासदार निवडणून येतील आणि नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची पुन्हा शपथ घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो. तसेच, त्या-त्या राज्यातील सूज्ञ मतदारांचे आभार व्यक्त करतो.
शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Maharashtra14 News

Recent Posts

सांगवी परिसरातील नागरिकांसाठी नवीन आधार केंद्राचे उदघाटन संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.10 ऑक्टोबर :- पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी नवीन आधार…

8 hours ago

अभिजात मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची ग्रंथदिंडी पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात….* *मराठी संस्कृती, साहित्य आणि अस्मितेचा जागर, शाळकरी विद्यार्थ्यांसह अबालवृद्धांचा सहभाग….

*अभिजात मराठी भाषेच्या वैभवशाली परंपरेची ग्रंथदिंडी पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात....* *मराठी संस्कृती, साहित्य आणि अस्मितेचा जागर,…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग व वेदव्यास प्रतिष्ठान पुणे संयुक्त उपक्रमातून एक लाख देशी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन

*डुडूळगाव येथे देशी वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात* *पिंपरी चिंचवड महापालिका, वन विभाग व वेदव्यास प्रतिष्ठान…

2 weeks ago

पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने दिव्यांग सर्वेक्षणासाठी आशा सेविकांना देण्यात आले विशेष प्रशिक्षण

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी २६ सप्टेंबर २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन यांच्या…

2 weeks ago

शंभरपेक्षा अधिक घरफोड्या, सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.21सप्टेंबर  : शंभरपेक्षा अधिक घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी अटक केली…

3 weeks ago