Categories: Uncategorized

मराठी पत्रकार परिषदेच्या 85 वर्धापन दिनी पत्रकारांची आरोग्य तपासणी..पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व लोकमान्य हॉलिस्टिक कॅन्सर केअर सेंटर च्या वतीने आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०३ डिसेंबर) : देशभरातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या 85 व्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व लोकमान्य हॅलो स्टिक कॅन्सर केअर सेंटर च्या वतीने सर्व पत्रकार बंधू भगिनी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच डिजिटल मीडियाच्या विविध पत्रकारांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग नोंदवला. पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल 85 पत्रकार बंधू भगिनी व कुटुंबियांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

या कार्यक्रमाचे उदघाटन राज्याचे अध्यक्ष शरद पाबळे यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी पुणे विभागीय सचिव गणेश मोकाशी, पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्ष अनिल वडघुले, कार्याध्यक्ष अविनाश आदक, डिजिटल मीडियाचे अध्यक्ष राजू वारभुवन, डॉ. देविदास शेलार, बापुसाहेब गोरे, प्रकाश जमाले आपला आवाज चे मुख्य संपादक अतुल परदेशी संगीता तरडे, साम टीव्हीचे गोपाळ मोटघरे, सामाजिक कार्यकर्ते अक्षय गायकवाड, मुकेश गायकवाड आदी उपस्थित होते.

मराठी पत्रकार परिषद ही देशातील सर्वात जुनी व सर्वात मोठी पत्रकार मातृसंस्था आहे. परिषदेचा वर्धापन दिन दरवर्षी आरोग्य दिन म्हणून 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो, मागील वर्षी एकाच दिवशी महाराष्ट्रातील 8 हजार पत्रकारांची तपासणी करण्यात आली होती तो एक आगळावेगळा रेकॉर्ड ठरला होता. यावर्षी तब्बल 10 हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, तसेच अध्यक्ष शरद पाबळे यांनी केला होता त्यानुसार सर्व तालुका, जिल्हा पत्रकार संघटनांनी आपापल्या भागात आरोग्य शिबिरांचे आयोजन केले होते.

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिरासाठी लोकमान्य कॅन्सर रिसर्च सेंटरचे अधिष्ठाता डॉ. निनाद नाईक, डॉ. क्षिरसागर, डॉ. सहदेव गोळे यांचे सर्व सहकारी तसेच नंदादीप सेरी आय हॉस्पिटल पिंपळे गुरव यांचे विशेष सहकार्य लाभले. या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर, डोळे तपासणी व विविध आजारांवर आयुर्वेदिक उपचार यावेळी करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. देविदास शेलार, महावीर जाधव, संतोष गोतावळे, नितीन कालेकर, अशोक कोकणे, सिद्धांत चौधरी, जेम्स साळवे, सोमनाथ नाडे, प्रसाद वडघुले, सागर बाबर, विनय सोनवणे, दत्तात्रय कांबळे, हनुमंत रामदासी, हर्षद कुलकर्णी, पराग डिंगणकर, प्रकाश अनंतकर, रमेश साठे, आदी पत्रकारांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला. डॉ. सहदेव गोळे यांनी सर्व उपस्थितीतांचे स्वागत केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष अनिल वडघुले यांनी केले, तर कार्याध्यक्ष अविनाश आदक यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

2 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago