Categories: Uncategorized

सांगवीत राही-माई प्रतिष्ठान संयुक्त प्रतिभा महिला प्रतिष्ठाणच्या वतीने विविध क्षेत्रात उज्वल यश प्राप्त केलेल्या गुणवंतांचा सत्कार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३ डिसेंबर) : सांगवी येथील राही-माई प्रतिष्ठान संयुक्त प्रतिभा महिला प्रतिष्ठाण यांच्या वतीने गुणवंतांचाचा सत्कार समारंभ मल्हार गार्डन, नवी सांगवी येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी या कार्यक्रमात मा.आमदार आश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप, शंकरभाऊ जगताप(शहराध्यक्ष), श्री.संतोष कांबळे, सौ.शारदा सोनवणे, श्री.हर्षल ढोरे, सौ.राणी ढोरे यांच्या शुभहास्ते गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम, विविध सहकारी संस्थेवर निवड झालेल्या मान्यवर तसेच सांगवी भागातील शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात उज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.

यामध्ये श्री.शिवलिंग किनगे ,श्री.प्रमोद ठाकर,श्री.नितीन खोडदे,श्री.सुमीत ढोरे,.(विविध सहकारी बॅक स॔चालक), श्री.कृष्णा भंडलकर.(सिनेट सदस्य), श्री.अक्षय नरेंद्र पुजारी(MPSC),दिग्विजय विश्वास मोरे (MPSC), डॉ.शुभम पंढरीनाथ दिवेकर (MD), श्री.अनिकेत अरुण दीक्षित (MAC), डॉ.पुष्कर पाटील (MBBS),डॉ.शीतल दिलीप तनपुरे (BHMS), डॉ.स्नेहल राजेंद्र गांधी (BHMS),डॉ.पुजा कालिदास शिंदे (BHMS),डॉ.मानसी पंडित (PHD),कु.गायत्री किरण दहिवाल (रोपिंग खेळाडू),कु.सिध्दी राजेंद्र मराठे (कबड्डी खेळाडू) यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना शंकर जगताप म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव मिळवा आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागरूक व्हावा यासाठी त्यांच्या यशाचे कौतुक करणे आणि अपयशात त्यांना आधार देणे व योग्य मार्गदर्शन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, आणि यातूनच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते”.

या कार्यक्रमास श्री.कैलास भागवत, श्री.दिलीप तनपुरे, श्री.संतोष ढोरे, श्री.गणेश ढोरे, सौ.दर्शनाताई कुभांरकर, सौ.संगिताताई दिक्षित, सौ.सारीकाताई भंडलकर, सौ.सोनाली शिंपी, सौ.राजेश्री लक्ष्मण ढोरे, श्री.दत्ता येणपुरे, श्री.वामनशेठ कड, श्री.मधुकर त्रिभुवन, श्री.गणेश काची, श्री.किरण दहिवाळ,श्री.भुषण शिंदे,श्री.अवि मारणे, श्री.सुरज चव्हाण, श्री.दत्ता म्हेत्रे विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या संयोजन मा.महापौर सौ.माई ढोरे,
श्री.जवाहर ढोरे यांच्या वतीने करण्यात आले होते, तर सुत्रसंचलन-श्री.नामदेवसर तळपे यांनी केले.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

2 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago