Categories: Uncategorized

घरगुती वापराचे सिलबंद गॅस सिलेंडर मधुन … मानवी वस्तीत धोकादायकपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्या तिघांना अटक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ मे) : पिंपरी-चिंचवड शहर हे एक औद्योगिक व शैक्षणिक दृष्टया अत्यंत महत्त्वाचे शहर असून येथे विविध कंपन्या, शैक्षणिक संकुल असल्याने मोठ्या प्रमाणत मानवी वसाहत असनु राज्यातून परराज्यातून लाखोचे संखेने कामगार वर्ग व विद्यार्थी मोठ्या प्रमाणत येत असतात. त्यांना लागणाऱ्या भौतिक गरजापैकी रोजच्या स्वयंपाकासाठी लागणारा गॅस तो सहज उपलब्ध होत नसल्याने याचा फायदा घेवुन काहि इसम पिंपरी-चिंचवड परीसरामध्ये घरगुती वापराचे सिलबंद गॅस सिलेंडर मधुन स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या पाईप सर्किटचे सहाय्याने कोणतीही खबरदारी न घेता रिकाम्या ४ किलोच्या छोटया गॅस टाक्यांमध्ये बेकायदेशिरपणे गॅस रिफील करून त्या टाक्या जादा दराने विकत असल्याची खात्रीशीर बातमी पोलीस नाईक १६०३ देवा राऊत व पोलीस हवालदार ८३२ जयवंत राऊत यांना मिळालेने सदरची माहिती वरीष्ठ अधिकारी व गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांना कळविली.

 त्यांनी कारवाई करणेबाबत आदेशित केल्याने, पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने व पोलीस अंमलदार जयवंत राऊत, संतोष इंगळे, देवा राऊत, सागर अवसरे यांचे पथकाने पदमजी पेपर मिल जवळ थेरगाव येथिल आर्या गॅस सर्व्हिस, सदाशिव कॉलनी, साने चाळ, या दुकानावर छापा मारला असता दोन इसम हे सिलबंद घरगुती गॅस सिलेंडर मधुन स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या कोणतीही खबरदारी न घेता लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल हे माहित असुन सुध्दा मानवी जिवीतास पोहचणाऱ्या कोणत्याही संभाव्य धोक्यापासुन सुरक्षित राहण्यास पुरेसा इतका बंदोबस्त करणे गरजेचे असताना ज्वालाग्राही पदार्थाबाबत पुरेसा बंदोबस्त करण्याचे जाणीवपूर्वक टाळुन लोखंडी रिफील पाईप सर्किटच्या सहाय्याने दुसऱ्या रिकाम्या ४ कीलोच्या टाक्यांमध्ये गॅस रिफील पकडण्यात आले.

यामध्ये १) विष्णु ज्योतीराम सुतार वय २४ वर्षे रा. सदाशिव कॉलनी, साने चाळ, पदमजी पेपर मिल जवळ थेरगाव, पुणे. मुळगाव मु. पो. विजयनगर, हनुमान मंदिरा शेजारी, ता. देवणी जि. लातूर व दुसऱ्या इसमाने त्याचे नाव २) अतुल श्रीहरी पांचाळ वय २५ वर्षे रा. सदाशिव कॉलनी, साने चाळ, पदमजी पेपर मिल जवळ धेरगाव, पुणे. सु. पो. कोहळनुर ता. जळकोट जि. लातूर यांना रंगेहाथ पकडले.

त्यांच्या ताब्यातुन ७८,७००/- रु किं चा एकुण मुद्देमाल त्यामध्ये २१ घरगुती वापराचे गॅस भरलेले विविध कंपनीचे सिलेंडर, ०१ घरगुती वापराचे रिकामे सिलेंडर, ०३ घरगुती वापराचे अर्धा गॅस काढलेली टाकी, ०१ व्यावसायीक वापराचे रिकामे सिलेंडर, ०५ लहान सिलेंडर, ०१ लहान पितळी रिफिलर, ०३ लोखंडी रिफील पाईप, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा, गॅस रीफिलिंग करीता वापरात येणारे एक गॅस रिफिलिंग सर्किट त्यास रबरी पाईप असलेले व दोन्ही बाजुस सिलेंडरला बसणारे पितळी व स्टिलचे कॉक व त्याचेवर लाल रंगाचे फिरवण्याचे बटण, ०२ लोखंडी अॅडजेस्टेबल पान्हे असे साहित्यसह मिळुन आले.

तसचे दुसऱ्या ठीकाणी सदाशिव कॉलनी, पदमजी पेपर मिल जवळ थेरगाव, पुणे या ठिकाणी याचप्रकारे एका रुममध्ये अवैधरित्या पाईप सर्किटचे सहाय्याने कोणतीही खबरदारी न घेता रिकाम्या ४ किलोच्या छोटया गॅस टाक्यांमध्ये बेकायदेशिरपणे गॅस रिफील करीत असल्याची माहिती मिळाल्याने तेथे छापा टाकुन इसम नामे जयराम सर्जेराव चौधरी वय २२ वर्षे रा. देवा मेटकरी यांची रूम लमाण तांडा नेहे दत्तवाडी ता. मुळशी जि. पुणे. मुळगाव- मु. कुंभारी, पो. वाघी बोबडे ता. जिंतुर जि. परभणी यास ताब्यात घेवून त्याच्या त्याच्यातुन ७१,५२५/- रु किं चा एकुण मुद्देमाल त्यामध्ये ९ घरगुती वापराचे गॅस भरलेले असलेले सिलेंडर, ११ घरगुती वापराचे रिकामे विविध कंपनीचे सिलेंडर, विविध कंपनीचे ०२ व्यावसायीक वापराचे रिकामे सिलेंडर, ११ भरलेले लहान सिलेंडर, १० रीकामे लहान सिलेंडर, ०२ पितळी रीफीलर नोजल, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा, ०१ लोखंडी अॅडजेस्टेबल पान्हा असे साहित्य जप्त करण्यात आले. सदरचे प्रकारे मानवी वस्त्यांमध्ये सुरु होते.

सदर दोन्ही कारवाई मध्ये एकुण १,५०,२२५/- रुपये कींमतीचा मुद्देमाल त्यामध्ये एकुण ४३ घरगुती वापराचे विविध कंपनीचे सिलेंडर, ०३ व्यवसायिक वापराचे सिलेंडर, २६ छोटे ०४ कीलोचे सिलेंडर असे एकुण ७२ विविध कंपनीचे गॅस सिलेंडर जप्त करुन ०३ आरोपी विरुध्द वाकड पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि. कलम २८५, २८६ सह जिवनावश्यक वस्तुचा कायदा १९५५ चे कलम ३, ७ सह स्फोटक पदार्थ अधिनियम सन १९०८ चे कलम ५ अन्यये ०२ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 week ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

1 week ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

3 weeks ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

4 weeks ago

“खड्डा दिसला तर फोटो काढा, ठिकाण नोंदवा” … पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आतापर्यंत २,२४७ पैकी १,७३३ खड्डे बुजविले; उर्वरित खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

  महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. १७ ऑगस्ट २०२६ :* पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अहवालानुसार,…

1 month ago