Categories: Uncategorized

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संबंधित नागरिकांचे  प्रश्न, तक्रारी सोडविण्याच्या दृष्टीने जनसंवाद एक प्रभावी माध्यम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ मे) : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महापालिकेच्या संबंधित नागरिकांचे  प्रश्न, तक्रारी सोडविण्याच्या दृष्टीने  सर्व क्षेत्रीय कार्यालयात महिन्यातील दुस-या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. नागरिकांना महापालिकेच्या संबंधित असलेल्या तक्रारी आडचणी लवकरात लवकर सोडविण्याच्या अनुषंगाने जनसंवाद सभेचे आयोजन आयुक्त तथा प्रशासक यांच्या सुचनेनुसार करण्यात येते.

महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग घेऊन एकूण ६२ तक्रारवजा सूचना मांडल्या.  यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह  क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे १३, ७, ४, ८, २, ९, ९ आणि १० तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.

            अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह, या  क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, मनोज सेठिया, उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, अजय चारठाणकर यांनी भूषवले.  क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित,उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सिताराम बहुरे, शितल वाकडे,सुषमा शिदे, विजयकुमार थोरात उपस्थित होते.

आज झालेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. संभाव्य पावसाळा लक्षात घेऊन रस्त्यांची साफसफाई करणेत यावी. पाणीपुरवठा सुरळीतपणे करावा. पावसाळ्या आधी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कामे करण्यात यावी. पदपथांवर उभारण्यात आलेली अतिक्रमणे काढण्यात यावी,  रस्त्याच्या वरील अनधिकृत फळविक्रेते, हातगाड्या तसेच उभारण्यात आलेले अतिक्रमण काढावेत,  अतिक्रमणाबाबत कायम स्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात  अशा सूचनांचा प्रामुख्याने समावेश होता.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

3 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

1 month ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago