Google Ad
Articles india

यंदाची बुद्ध पौर्णिमा आहे अत्यंत विशेष … वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण आणि दोन शुभ योगायोग

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५मे) : वैशाख महिन्यातील पौर्णिमा यावेळी २६ मे रोजी येत आहे. याला बुद्ध पौर्णिमा देखील म्हटलं जातं. मान्यता आहे की या दिवशी भगवान बुद्ध यांचा जन्म झाला होता. भगवान बुद्ध यांना विष्णू भगवान यांचा नववा अवतार मानला जातो. तर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशीच वर्ष २०२१ चं पहिलं चंद्र ग्रहण (First Lunar Eclipse of 2021) देखील लागणार आहे. त्यामुळे या पौर्णिमेचं महत्त्व आणखी वाढलं आहे.

कुठल्याही पौर्णिमेच्या दिवशी दान-स्नानचं विशेष महत्व असतं. पण यावेळी पौर्णिमा आणि चंद्र ग्रहणाच्या संयोगाने दान-पुण्याचं महत्व अधिक वाढलं आहे. जाणून घेऊया या दिवसाबाबत संपूर्ण माहिती

Google Ad

▶️शुभ मुहूर्त

पौर्णिमा तिथी 25 मे 2021 ला मंगळवारी रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल आणि 26 मे बुधवारी सायंकाळी 4 वाजून 43 मिनिटांपर्यंत असेल. यादिवशी दान करण्यासाठी सकाळची वेळ शुभ असेल

▶️या पौर्णिमेला दोन शुभ योग

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दोन शुभ योग जुळून येत आहेत, त्यामुळे ही तिथी आणखीच विशेष झाली आहे. या दिवशी अमृत सिद्धी योग आणि सवार्थ सिद्धी योग आहेत, हे दोन्ही योग कुठलं शुभ कार्य करण्यासाठी शुभ आणि लाभदायाक मानले जातात. त्याशिवाय बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दिन सूर्य नक्षत्र रोहिणी असेल, तर नक्षत्र पद अनुराधा आणि ज्येष्ठा असेल.

▶️जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व

तिथी कुठलीही असो गंगा स्नान किंवा इतर कुठल्याही नदीत स्नान करण्याला पवित्र मानलं जातं. स्नान केल्यानंतर भगवान नारायणाची पूजा करावी आणि सामर्थ्यानुसार गरजुंना दान द्यावे. असे केल्याने आयुष्यातील अनेक कष्ट दूर होतात. कळत-नकळत आपल्या हातून घडलेल्या पापांतून मुक्ती मिळते.

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सत्यविनायक व्रतही ठेवले जाते. मान्यता आहे की या दिवशी केलेल्या उपवासाने धर्मराज यमराज प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील अकाली मृत्यूचा धोका टळतो. पौर्णिमेच्या दिवशी साखर आणि पांढरे तीळ दान करणे शुभ मानले जाते. तसेच पांढऱ्या वस्तू जसे पीठ, दूध, दही, खीर इत्यादी दान करु शकता.

▶️हे लक्षात ठेवा

कोरोना काळात कुठल्याही नदीवर स्नान करण्यास जाणे हे धोकादायक आहे, त्यामुळे पवित्र नदीत स्नान करण्याचं पुण्य कमावण्यासाठी घरीच आंघोळीच्या पाण्यात थोडं गंगा जल मिसळा. यामुळे ते पाणी पवित्र होईल. त्यानंतर देवी गंगेचा मनात आराधना करा आणि त्या पाण्याने आंघोळ करा.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

Google Ad

About the author

Maharashtra14 News

233 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!