Google Ad
Articles Editor Choice

नवी सांगवी -पिंपळे गुरव मधील चाहत्यांकडून ‘ अश्विनीताई जगताप’ यांना सोशेल मीडियावर पोस्ट शेअर करत वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ नोव्हेंबर) : माणसाला योग्य वेळी केलेली मदत ते कधीच विसरत नाहीत. यातील एक व्यक्तिमत्त्व म्हणजे सर्वांच्या लाडक्या ‘वहिनी’ काहीजण त्यांना ‘माई’ म्हणून संबोधतात. अशाच या माईंचा वाढदिवस या दिवाळीत आगळा वेगळा ठरला. ‘अश्विनीताई लक्ष्मण जगताप’ यांना अनेक लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या चाहत्यांनी, घरी जाऊन तसेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

तळागाळात जाऊन करत असलेले माईंचे काम अतिशय चांगले आहे. पती आमदार लक्ष्मण जगताप यांच्या खांद्याला खांदा लावून माई अहोरात्र संकटकाळी आपल्या माणसांना मदत करण्यात आघाडीवर असतात. त्यांच्या या स्वभावाने अनेक माणसं जोडली गेली , आणि एक प्रेमाचं गोड नात सांगवी-पिंपळे गुरव मध्ये तयार झालं ते आज अनुभवयास मिळते.

Google Ad

कोरोनाच्या संकटात ज्यांचा करता गेल्यामुळे दिवाळी सण करता आला नाही, या सणाला नाट लावू नये म्हणतात, त्यामुळे अशा सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत स्वतः दिवाळी फराळ दिला, आणि त्यांची दिवाळी गोड केली.

समाजात काम करताना एखादे काम झाले नाही तरी चालेल, पण काम घेऊन येणाऱ्या माणसाला आपण त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला याची जाणीव व्हायला हवी. जी चांगली माणसं काम करतात, त्याला अडथळे येतातचं. मात्र ते पार करुन जाणं हा ‘अश्विनी जगताप’ यांचा स्वभाव आहे. अनेक वर्षांपासून प्रतिभा महिला बचतगटाच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या करिता अनेक उपक्रम राबवून त्यांच्या हाताला काम दिले. आपल्या घरातील एक असे ते अस्तने आपल्या कार्यकर्त्यांची चौकशी करत असतात. त्याचाच प्रत्यय नुकत्याच झालेल्या विधानसभेत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना नवी सांगवी पिंपळे गुरवकरांनी दिलेल्या भरगोस मतदानातुन दिसून आले. चिंचवड मतदार संघ हा तुलनेत सर्वात मोठा, त्यामुळे नवी सांगवीत निवडणूक काळात पायही न ठेवता, अश्विनी जगताप यांच्या पाठबळावर त्यांच्या शब्दांवर जनतेने विक्रमी मतांनी त्यांना पुन्हा विधानसभेत पाठविले.

आपल्या भागाला नेहमीच काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न अश्विनी जगताप यांनी पती लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून केला, आणि करत आहेत. परिसरातील नागरिकही आपली अडचण काम हे त्यांना निःसंकोचपणे घरातील एक याप्रमाणे सांगतात, त्यामुळे नवी सांगवी- पिंपळे गुरवचा झालेला विकास हा डोळ्यांत भरण्यासारखा आहे. या विकासा बरोबरच पिंपरी चिंचवड शहराचा झपाट्याने होत असलेला कायापालट भावी पिढीला एक वरदान ठरल्याशिवाय राहणार नाही.

 

त्यांच्या या कार्याची पावती म्हणूनच अशा या माईंचा तर काहींच्या ताईचा वाढदिवस या दिवाळीत आगळा वेगळा ठरला. अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांना अनेक लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या चाहत्यांनी घरी येऊन, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

40 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!