Google Ad
Uncategorized

पुण्याजवळील आंबेगाव तालुका परिसरात लंगोटीवाल्या चोरट्यांची दहशत … सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले चोरटे

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे जिल्ह्यात गारठा चांगलाच वाढला आहे. अशा गारठ्यात पुण्याजवळच्या आंबेगाव परिसरात लंगोटीवाल्या चोरट्यांची दहशत पसरली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्यात भीतीचं वातावरण पसरली आहे.
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक परिसरात आज (बुधवार) पहाटे चोरट्यांनी पाच ठिकाणी घरफोडी करून चोरी केली.चोरट्यांच्या दहशतीने नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले असून आठ ते दहा चोरट्याची टोळी ही चोरीच्या उद्देशाने गावामध्ये फिरत असताना सीसीटीव्ही कॅमरामध्ये चित्रीत झाले आहेत.

अवसरी बुद्रुक परिसरात चोरट्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. या चोरट्यांपैकी काहीजण एवढ्या थंडीतही लंगोटी घालून फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याने नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला असून चोरीच्या वाढत्या घटना रोखण्याचे मोठे आव्हान आता पुणे ग्रामीण पोलिसांपुढे असणार आहे.

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!