Google Ad
Uncategorized

Pune : पुण्यात पुन्हा रानगव्याचे दर्शन … बावधन परिसरात उडाली खळबळ

महाराष्ट्र 14 न्यूज : पुण्यात काही दिवसांपूर्वी एक रानगवा पुण्यात दिसला होता. मात्र लोकांचा जमाव आणि वन विभागाच्या चुकांमुळे त्याला आपला जीव गमवावा लागला. मात्र आता पुन्हा एकदा पुण्यात कोथरूडमध्ये रानगव्याचे दर्शन झाले आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर बावधन येथे हा गवा आढळून आला आहे. डोंगर आणि जंगल भाग जवळच असून तेथून हा गवा आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून गव्याला पकडण्यासंबंधी चर्चा सुरु आहे.

दरम्यान गेल्यावेळी गव्याला पकडताना झालेल्या चुका आणि बघ्यांची गर्दी टाळण्याचं मोठं आव्हान वनविभागासमोर आहे. याआधी ९ डिसेंबरला पुण्यात गवा दिसला होता. जंगलातला गवा ९ डिसेंबर २०२० या दिवशी थेट पुण्याच्या कोथरूड भागात रस्त्यावर आला. त्यानंतर गव्याच्या मागे लागलेला जमाव, गव्याचे पुण्याच्या रस्त्यावरून वेडेवाकडे धावणे, त्याला सुखरूप मूळ जागी पोहोचवण्याच्या दृष्टीने सारे प्रयत्न, रेस्क्यू ऑपरेशन आणि सरतेशेवटी पकडल्यावर गव्याचा झालेला दु:खद मृत्यू असा सगळा घटनाक्रम घडला होता.तथापि, हायवेच्या बाजूला असलेल्या संरक्षण भीतीजवळ रानगवा फिरताना दिसून आला आहे. या रानगव्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. रानगवा आढळून आल्यामुळे एकच धावपळ उडाली आहे. स्थानिकांनी रानगवा आढळल्याची माहिती पोलीस आणि वनविभागाला दिली होती. थोड्यात वेळात वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचले आहे. रेस्क्यू ऑपरेशनसाठी लोकांचे सहकार्य आवश्यक आहे, त्यामुळे कृपया येथे कोणीही गर्दी करू नये, असं आवाहन नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी केले आहे.

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!