Categories: Uncategorized

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतच्या भव्य-दिव्य वास्तूची प्रत्यक्ष भाजप पदाधिकाऱ्यांनी केली प्रत्यक्ष पाहणी …

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.17 एप्रिल :पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रगत आणि आधुनिक प्रतिमेला साजेसी अशी महानगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत आता पूर्णत्वास येत आहे. आज या भव्य-दिव्य वास्तूची प्रत्यक्ष पाहणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली.

पिंपरी चिंचवड शहराचा वाढता विस्तार आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन ही इमारत अत्यंत नियोजित पद्धतीने उभारण्यात आली आहे. अत्याधुनिक सोयी-सुविधा, प्रशस्त दालने आणि सुसज्ज प्रशासकीय विभाग यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांची कामे अधिक जलद गतीने होण्यास त्यामुळे मोठी मदत होणार आहे.

यावेळी बोलताना सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे म्हणाले, “ही वास्तू केवळ एक इमारत नसून, आपल्या शहराच्या प्रगतीचे आणि विकासाच्या जिद्दीचे प्रतीक आहे. शहराच्या वैभवात मानाचा तुरा रोवणाऱ्या या देखण्या वास्तूचे काम पाहून खरोखरच समाधान वाटले”.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी उपमहापौर मा. श्रीमती शर्मिलाताई बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष मा. श्री. अभिषेकजी बारणे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

 

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

2 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

4 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago