Google Ad
Maharashtra crimes

Pune : पुणे पोलिसात खळबळ … पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या … अधिकाऱ्याने इतका टोकाचा निर्णय का घेतला ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३०ऑगस्ट) : मोटार परिवहन विभगातील सहायक पोलीस निरीक्षक राजेश महाजन यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलीस निरीक्षकाच्या आत्महत्येच्या या घटनेमुळे पुणे पोलिसात एकच खळबळ उडाली आहे. राजेश महाजन हे रिजर्व होते. ते मोटार परिवहन विभागात कार्यरत होते. त्यांनी आज (३० ऑगस्ट) दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Google Ad

▶️आत्महत्येमागील कारण नेमकं काय?
राजेश महाजन यांनी अचानक आत्महत्या केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच सहायक पोलीस निरीक्षकाच्या आत्महत्येचे वृत्त संपूर्ण शहरात वाऱ्यासारखं पसरलंय. पोलीस निरीक्षकाने आत्महत्या का केली असावी? असा सवाल अनेकांना सतावत आहे. पण त्यांच्या परिजनांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजेश महाजन यांनी नैराश्यातून आत्महत्या केली. त्यांच्या पत्नीचे गेल्या महिन्यात निधन झालं होतं. त्याच शोकात ते नैराश्यात गेले होते. त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

83 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!