Google Ad
Education

श्री शिवाजी विद्यामंदिर,औंध प्रशालेत 5 वी ते 7 वी चे वर्ग सुरू – विद्यार्थ्यांना शालेय वह्या,सॅनिटायझरचे वाटप करून अनोखे स्वागत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ डिसेंबर) : राज्यात गेली दोन वर्षे कोविड19 मुळे शाळा बंद पण शिक्षण सुरू होते.मध्यंतरी प्रशाला चालू झाल्या त्यावेळीही अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत केले होते परंतु यावेळी पाचवी ते सातवी चे वर्ग दोन वर्षांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच चालू होतं असल्यामुळे शासकीय आदेशाचे व नियमांचे पालन करून शाळा आनंदी वातावरणात सुरू झाली .

शाळा सुरू करण्यापूर्वी आरोग्य, स्वच्छता आणि इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात आले आहे. अनोख्या पद्धतीने रांगोळी सजावटीतून कोरोना विषयी संदेश मुलांना दिला तसेच वर्ग सजावटही करण्यात आली होती. शालेय प्रशासनाच्या आणि शिक्षकांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्याना शालेय वह्या व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या पर्यवेक्षिका भारती पवार,संस्थेचे कार्याध्यक्ष कांबळे वाय.जी. जेष्ठ शिक्षिका निलम जगताप,हिरा शेळके, शिक्षक प्रतिनिधी बिपीन बनकर, गायत्री देशमुख, अशोक गोसावी ,शंकर बोराटे, सुषमा असवले, सुषमा लेंभे, राजश्री चव्हाण, रंजना इंदारी तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.

Google Ad

विद्यार्थ्यांच्या निरागस चेहऱ्यावर आज आनंद ओसंडून वाहत होता.सर्व विद्यार्थ्यांनी सोबत येताना पालकांचे हमीपत्र घेऊन आले होते.पहिल्याच दिवशी 50 ते 60 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. काही मुले ग्रामीण भागात गावी असल्यामुळे मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षणात खूप तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत होते त्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाला अक्षरशः कंटाळले होते .

विद्यामंदिरात पाऊल टाकताना जुन्या आठवणींची शिदोरी पाठीशी घेऊन नव्या संकल्पनांचे क्षितिज गाठण्यासाठी विद्यार्थी प्रशालेत नव्या उमेदीने प्रवेश करताना दिसले. विद्यार्थ्यांचा किलबिलाट व त्यांचे उत्सुक व हसरे चेहरे पाहून शिक्षकांचाही आनंद द्विगुणित झाला. नवहिंदवी युगाच्या शिल्पकारांचे शिक्षकांनी आनंदाने स्वागत केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!