Google Ad
Editor Choice Education

दापोडी येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या करियर कट्टा चे उद्घाटन उत्साहात संपन्न!”

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ डिसेंबर) : दापोडी , पुणे. येथील श्रीमती सी.के. गोयल कला, वाणिज्य महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने बुधवार दि.१५/१२/२०२१ रोजी सकाळी ९:३० ते ११:०० या वेळेत”करियर कट्टा”या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर साठी उपयुक्त असे स्किल डेव्हलपमेंट, उद्योजकता विकास, स्पर्धा परीक्षा तयारी, संविधानाचे पारायण असे विविधांगी मार्गदर्शन या करियर कट्टा उपक्रमा द्वारे विद्यार्थ्यांना होणार आहे.

ऑनलाइन पद्धतीने हे मार्गदर्शन होणार असून महाविद्यालयाच्या वेळेव्यतिरिक्त युट्युब व इतर माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन मिळणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
कार्यक्रमासाठी मार्गदर्शक: म्हणून मा. श्री. यशवंत शितोळे (अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र.) आणि प्रा.डॉ.राणीताई शितोळे( समन्वयक, माहिती कट्टा पुणे जिल्हा) हे उपस्थित होते.

Google Ad

मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना करियर कट्टा वरील उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. व स्वतःच्या करिअर साठी विद्यार्थ्यांनी या कट्ट्याचा उपयोग करून घेऊन स्वतःचे भवितव्य उज्ज्वल करावे‌असे आवाहन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष: महाविद्यालयाचे प्रभारी, प्राचार्य डॉ.सुभाष सूर्यवंशी होते. त्यांनी आपले अध्यक्ष मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन: करिअरकट्टा चे महाविद्यालयीन समन्वयक प्रा .सिद्धार्थ कांबळे यांनी केले.

आभार प्रदर्शन: प्रा.दिपाली खर्डे यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यार्थीची संख्या लक्षणीय होती.१०२ विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमासाठीउपस्थितांमध्ये प्रा .डॉ. बाळासाहेब माशेरे, प्रा .डॉ. सोमनाथ दडस, प्रा. अमरदिप गुरमे, प्रा.विनोद डिके, प्रा.ज्योती लेकुळे, प्रा. वैभव वरडुले, प्रा. उत्तम गोरड,श्री. कपिल कांबळे, हे उपस्थित होते.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!