Google Ad
Celebrities Editor Choice Fashion Music Pimpri Chinchwad

ती आली, तिनं पाहिलं,अन तिनं जिंकलं … पिंपळे गुरवमध्ये नगरसेवकांपासून ते जेष्ठांपर्यंत सर्वांनी घेतला ‘हॅप्पी स्ट्रीट’ चा आनंद!

महाराष्ट्र 14 न्यूज : ती आली, तिनं पाहिलं,अन तिनं जिंकलं … पिंपळे गुरवमध्ये नगरसेवकांपासून ते जेष्ठांपर्यंत सर्वांनी घेतला ‘हॅप्पी स्ट्रीट’ चा आनंद! औचित्य होत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कला- क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे…

Google Ad

रविवारी म्हटलं की जरा काही वेगळं आणि हटके परंतु ते जर सर्वांच्या बरोबर एन्जॉय करायला मिळालं तर कोणाला नकोय, असाच काही हटके कार्यक्रम करण्याचे सांगवी पिंपळे गुरव मधील नागगसेवकांनी ठरवलं आणि आज रविवारी पहाटेच कृष्णा चौक ते काटे पुरम चौकाकडे नागरिकांचे अक्षरशः लोंढेचे लोंढे दिसायला लागले, निळू फुले नाट्यगृहा समोर गर्दीचा महापूर दिसू लागला अन ती वेळ झाली अभिनेत्री माधुरी पवार ची स्टेजवर एन्ट्री झाली.

गेम होस्ट आर जे अक्षय आणि टीम डान्स फ्लोअर स्टुडिओ साऊंड सिस्टमने ठेका धरला आणि संपूर्ण तरुणाईन गाण्याचा ठेका धरत कार्यक्रमात रंगात आणली, त्यात नगरसेवकही कुठे कमी पडले नाहीत, त्यांची पावलही अलगद या तालावर थिरकली, अन त्यांनीही या संगीताचा आनंद घेत नृत्य केले.

रस्ते गर्दीने अक्षरशः फुलले होते, काही जेष्ठ नागरिक घराच्या गच्चीतून आनंद घेत होते, पाहावं तिकडे गर्दीच गर्दी दिसत होती, अनेक प्रकारच्या खेळांचे प्रकार या हॅप्पी स्ट्रीट वर दिसून येत होते, लहान मुलांपासून ते महिला,पुरुष यांनी यात सहभाग घेतल्याचे दिसून येत होते. यात स्केटिंग, मल्ल खांब ,फुगडी , ढोल, झुंबा डान्स, गेम होस्ट, बॅलन्स, टॅटू, केक कटिंग,योग असे मजेदार कार्यक्रमांचा मनमुरादपणे आनंद नागरिक घेताना दिसत होते.

कार्यक्रमाचे नियोजन संयोजकांनी अगदी नाविन्यपूर्ण असे केले होते. त्त्यामुळे कोणतीही कमतरता जाणवली नाही. रस्त्यावर दुतर्फा झालर, कमानी, रांगोळ्या आणि नियोजन करण्यासाठी ठीक ठिकाणी बोउन्सर ठेवण्यात आले होते. सकाळी बरोबर सात वाजता शहराच्या महापौर माई ढोरे आणि सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत नागरिकांना हात उंचावून कार्यक्रमाला सुरुवात झाली, आणि बरोबर नऊ वाजता कार्यक्रमाची सांगता झाली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!