Google Ad
Editor Choice

SBI ग्राहकांच्या खिशाला बसणार कात्री , चेकबुक आणि ATM मधून पैसे काढण्यासाठी लागणार चार्जेस

महाराष्ट्र 14 न्यूज : तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांच्या खिशाला 1 जुलैपासून कात्री लागणार आहे. SBI बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट (BSBD) खातेदारांसाठी नवे चार्जेस 1 जुलै 2021 पासून लागू होणार आहेत. बँकेने एटीएममधून पैसे काढणं, चेकबुक, मनी ट्रांसफर आणि नॉन फाइनेंशियल ट्रांझेक्शनवर सर्व्हिस चार्जेस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने याबाबत त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती दिली आहे.

▶️SBI ब्रांचमधून पैसे काढण्यासाठी लागणारे चार्ज –
लाईव्ह हिंदुस्तानने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांनी एका महिन्यात 4 पेक्षा जास्त वेळा एसबीआयच्या शाखेतून अथवा एटीएममधून पैसे काढल्यास त्यासाठी 15 रुपये आणि जीएसटीची रक्कम आकारली जाईल. प्रत्येक ट्रांझेक्शनसाठी तुम्हाला इतका चार्ज द्यावा लागेल.
हा नियम एसबीआय एटीएम आणि इतर बँकांच्या एटीएमसाठी लागू होईल.

Google Ad

▶️चेकबुकसाठीही द्यावे लागणार पैसे –
स्टेट बँक ऑफ इंडिया बीएसबीडी खातेदारांकडून चेकबुकसाठी पैसे घेत नाही. मात्र, 10 चेक झाल्यानंतर 40 रुपये आणि जीएसटी आकारले जाते. तर, 25 चेक असणाऱ्या चेकबुकसाठी 75 रुपये आकारले जातील. याशिवाय इमर्जन्सी चेकबुकसाठी 50 रुपये आणि जीएसटी चार्ज द्यावा लागेल. या नियमांमधून ज्येष्ठ नागरिकांना सूट देण्यात आली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!