Categories: Uncategorized

पुणे जिल्ह्याला पावसाचा तडाखा, आभाळ फाटलं, आंबेगावात ढगफुटीसदृश्य पाऊस

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ सप्टेंबर) :  एक ते दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला आहे.

त्यामुळं सामान्यांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यातच आता पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याची माहिती समोर येत आहे. मुसळधार पावसामुळं पुण्याच्या ग्रामीण भागातल्या अनेक नदी-नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. त्यामुळं वरुणराजाचं पुनरागमन झाल्याने आनंद व्यक्त करावा की पावसामुळं शेतीचं नुकसान झालं, याचा शोक व्यक्त करावा, असा प्रश्न पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी तीन वाजेपासून पुणे शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. तीन वाजता सुरू झालेला पाऊस संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत सुरू होता. आंबेगाव तालुक्यातील काठापूर मध्ये तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. परिणामी अनेक शेतातील बांध फुटले असून उभी पीकं पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. शेतीपिकांचं नुकसान झाल्याने तातडीने पंचनामे करून बळीराजाला आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच काही तासांतच विक्रमी पावसाची नोंद करण्यात आल्याने जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.

महिन्याभरानंतर वरुणराजाचं आगमन झाल्याने आम्ही समाधानी आहोत, परंतु या पावसामुळं शेतीपिकांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. उगवत असलेली पीकं नाहीशी झाली आहे. हाती आलेल्या पिकांनाही पावसामुळं मोठा झटका बसला आहे. याशिवाय अनेक नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे देखील पिकांचं नुकसान होत असल्याची भावना आंबेगावातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पुण्यासह सांगली, सातारा, सोलापूर, आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची नोंद करण्यात आल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; … २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली

आकाशचिन्ह व परवाना विभागाची विक्रमी झेप; २०२५-२६ मध्ये २१.५० कोटींची वसुली मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे…

5 days ago

राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर पिंपरी-चिंचवडला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत! … प्रशांत शितोळे

महाराष्ट्र 14 न्यूज, दि २९ मार्च : पिंपरी-चिंचवड शहराला खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट’ आणि सोयीसुविधांनी युक्त…

6 days ago

SIR म्हणजे काय? SIR यादीत (मतदार यादी) नाव आहे की नाही? पहा कसं चेक करायचं?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२९ मार्च : पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत सध्या राज्यभरात…

7 days ago

सर्वसामान्यांना महागाईत मोठा दिलासा …! १ एप्रिलपासून वीज दरात कपात, प्रति युनिटमागे किती रुपये द्यावे लागणार?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ मार्च : सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी नवीन आर्थिक…

1 week ago

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महिला नगरसदस्यांच्या उपस्थितीत शहरातील उत्कृष्ट महिला बचत गटांचा विशेष सन्मान

महाराष्ट्र 14 न्यूज, १७ मार्च २०२६ :-* महिलांचे योगदान समाजासाठी खूप मोठे आहे. एक महिला…

3 weeks ago

अखेर पिंपरी चिंचवडला मिळाले पुण॔वेळ आयुक्त … डॉ. विजय सूर्यवंशी महापालिकेचे नवे आयुक्त

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.११ मार्च : राज्यात आज बुधवारी पुन्हा एकदा बड्या आयएएस अधिकाऱ्याची महत्वाच्या…

4 weeks ago