Categories: Uncategorized

साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर

महाराष्ट्र 14 न्यूज पिंपरी, दि. ३ फेब्रुवारी २०२६ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून शहरात मालमत्ता कर वसुलीची मोहीम सुरू आहे. चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आता केवळ दोन महिने शिल्लक राहिले आहेत. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना कर भरण्यास अधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिकेचे मुख्य कार्यालय तसेच शहरातील १८ विभागीय कर संकलन कार्यालये शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील मालमत्ताधारकांसाठी कर भरण्यासाठी १८ विभागीय कर संकलन कार्यालये कार्यान्वित असून, या ठिकाणी तसेच ऑनलाईन पद्धतीने कर भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. कर संकलन विभागाच्या वतीने थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई सुरू असून, थकबाकीदारांवर मालमत्तांची जप्ती करणे तसेच नळ कनेक्शन खंडित करण्याच्या कारवाया केल्या जात आहेत. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी आपला थकीत मालमत्ता कर वेळेत भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
…..

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागाच्या वतीने विविध माध्यमांतून नागरिकांना मालमत्ता कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांसाठी ऑनलाईन कर भरणा करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरातील करदात्यांनी मालमत्ता कराचा भरणा करून शहराच्या विकासामध्ये हातभार लावावा.
— तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
…..
सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तसेच शनिवार आणि रविवार या कालावधीत सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत सर्व १८ विभागीय कर संकलन कार्यालयांतील कॅश काऊंटर सुरू असणार आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी कर भरण्याची वेळ वाढविण्यात आली असून, दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत ही सुविधा उपलब्ध असणार आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा.
— सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

2 days ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

2 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

2 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

1 month ago