Categories: Uncategorized

पिंपरी चिंचवड युवा सेनेची आदरांजली … विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पुढाकार

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ फेब्रुवारी : पिंपरी-चिंचवड युवा सेनेच्या वतीने स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच मावळचे पहिले खासदार स्वर्गीय गजानन बाबर यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दोन मिनिटे मौन पाळून स्वर्गीय अजितदादा पवार व स्वर्गीय गजानन बाबर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

फुगेवाडी येथील कै. मीनाताई बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय, येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू अशा १० विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी युवा सेनेने दत्तक घेतले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याचा संकल्प युवा सेनेच्या वतीने करण्यात आला.

शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. स्वर्गीय अजितदादा पवार व स्वर्गीय गजानन बाबर यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात नेहमीच सर्वसामान्यांच्या हितासाठी कार्य केले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अशा समाजोपयोगी उपक्रमातून त्यांना आदरांजली अर्पण करणे, हाच या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

2 days ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

2 weeks ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

2 weeks ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

1 month ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

1 month ago